यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप इंडिया
भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्रीडा उपक्रमांपैकी एक विविधता आणि सर्जनशीलतेचा उत्सव नोव्हेंबर १ पासून मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे १३ प्रादेशिक व बँड सिटी फायनल्स
पुणे-
दुसऱ्या हंगामातच, देशभरातील २,५०० पेक्षा जास्त शाळांमधील २ लाखांहून अधिक मुले यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप २०२५ मध्ये सहभागी झाली आहेत त्यामुळे हा भारतातील सर्वात मोठा खासगी पातळीवरील क्रीडा उपक्रम ठरला आहे.
हा उपक्रम सर्वसमावेशकता आणि सर्जनशीलता प्रोत्साहित करतो, ज्यामध्ये विविध सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतील मुले सहभागी होतात. अनेक शाळांनी त्यांच्या स्पर्धा शाळेच्या प्रांगणात, समुद्रकिनारी किंवा बंद रस्त्यावर आयोजित करून कल्पकतेचे उदाहरण दाखवले आहे.
१ नोव्हेंबरपासून १३ प्रादेशिक व ग्रँड सिटी फायनल्स मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे पार पडतील, ज्यात देशातील सर्वात आशादायी तरुण खेळाडू आपली कामगिरी दाखवतील.
भारताचा क्रीड़ा भविष्य घडवणारी चळवळ
फक्त दुसऱ्या वर्षातच यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप इंडिया हा देशातील सर्वाधिक प्रभावी आणि समावेशक उपक्रम बनला आहे. २,५०० हून अधिक शाळा आणि २ लाखांहून अधिक विद्यार्थी या उपक्रमाचा भाग आहेत, ज्यामुळे समाजातील सर्व स्तरातील मुले एकत्र येत आहेत.
शहरी शाळांपासून ते दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यत प्रत्येक मुलाला खेळण्याची, स्पर्धा करण्याची आणि वाढण्याची संधी मिळते. अनेक शाळा सर्जनशील पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात समुद्रकिनारी, शाळेच्या मैदानात किंवा बंद रस्त्यांवर हे दाखवून की क्रीडेबद्दलची आवड असली की मोठी सोय लागत नाही, फक्त इच्छाशक्ती लागते.
डॅनिएल शेन्कर, डीएसपॉवरपार्ट्सचे सीईओ आणि उपक्रमाचे सह-संस्थापक म्हणतातः “यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप भारताच्या क्रीडा भविष्याला आकार देणारे एक सामर्थ्यवान साधन बनले आहे.
फक्त दोन वर्षांत २ लाख मुले यात सहभागी झाली आहेत दहा वर्षांनी ही संख्या किती प्रेरणादायी असेल, याची कल्पना करा! या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास आणि सक्रियता वाढेल आणि भविष्यातील भारताचे क्रीडाचॅम्पियन तयार होतील.”
नीरज चोप्रा यांचा अभिमान पुढच्या पिढीसाठी प्रेरणा
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, जो यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कपचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे, म्हणतोः “इतक्या मुलांना अॅथलेटिक्सचा आनंद घेताना पाहणे खूप छान वाटते. मला या उपक्रमात सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला, त्याच्या पार्श्वभूमीशी काहीही घेणेदेणे नसले तरी. खेळात सहभागी होण्याची, स्वतःला आव्हान देण्याची आणि मोठे स्वप्न पाहण्याची संधी मिळते. हे अनुभव त्यांचा आत्मविश्वास वाढवतात आणि आयुष्य बदलू शकतात.”
चार शहरांत १३ फायनल्स नोव्हेंबर १ पासून सुरुवात
१ नोव्हेंबर ते १७ जानेवारी दरम्यान मुंबई, पुणे, हैदराबाद आणि चेन्नई येथे एकूण १३ फायनल्स आयोजित केल्या जातील. या स्पर्धांमध्ये शेकडो शाळांमधील उत्कृष्ट खेळाडू व्यावसायिक वातावरणात स्पर्धा करतील प्रयत्न, प्रतिभा आणि हालचालीचा उत्सव साजरा करतील.
मथियास शाके, यूबीएस इंडिया सर्व्हिस कंपनीचे प्रमुख म्हणतातः “हे फक्त पदक जिंकण्याबद्दल नाही – हा उपक्रम प्रत्येक मुलाच्या आयुष्याचा भाग म्हणून खेळाची संस्कृती विकसित करण्याबद्दल आहे. जेव्हा मुले अधिक सक्रिय, निरोगी आणि समाजाशी जोडलेली राहतात, तेव्हा आपण एक चांगले भविष्य घडवतो.”
भारतासाठी दृष्टी
बालकांमध्ये वाढत्या जीवनशैलीसंबंधी आरोग्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर, यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कपचे उद्दिष्ट आहे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय पिढी घडवणे. हा उपक्रम केवळ सहभागापुरता मर्यादित नाही, तर दीर्घकालीन क्रीडा विकासाची पायाभरणी करतो जो भविष्यात भारताच्या ऑलिम्पिक प्रवासासाठी एक पाऊल ठरू शकतो.
पहिल्या हंगामात काही हजार मुलांपासून सुरु झालेली ही चळवळ आज देशभरातील समावेशकता, सर्जनशीलता आणि प्रेरणेची लाट बनली आहे आणि प्रवास आता फक्त सुरू झाला आहे.
यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कप बद्दल
यूबीएस अॅथलेटिक्स किड्स कपमध्ये स्प्रिंट, लांब उडी आणि बॉल थ्रो या मूलभूत अॅथलेटिक्स प्रकारांचा समावेश आहे. हा उपक्रम मुलांच्या सर्वांगीण शारीरिक विकासाला, टीमवर्कला आणि क्रीडाभावनेला प्रोत्साहन देतो. वय ७ ते १५ वर्षे असलेल्या सर्व मुलांसाठी ही स्पर्धा खुली आहे आणि सहभाग पूर्णपणे मोफत आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या: www.ubsathleticskidscup.com

