मुंबई, 17 नोव्हेंबर 2025: भारतातील सर्वात मोठी अगत्यशील कंपनी असलेल्या इंडियन हॉटेल्स कंपनीने (आयएचसीएल) स्पर्श इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेडमधील 51% हिस्सा खरेदी करण्यासाठी आज करारांवर स्वाक्षरी केली. पुण्याजवळील मुळशी येथील लक्झरी वेलनेस सेंटर ‘आत्मंतन‘ ब्रँडची मालकी या कंपनीकडे आहे. या अधिग्रहणामुळे आयएचसीएलला आत्मंतन ब्रँडची मालकी तसेची त्याची प्रोप्रायटरी अशा दोन्ही गोष्टी मिळतील. ज्यामुळे त्याच्या संस्थापक प्रवर्तकांच्या सहकार्याने या वेलनेस प्लॅटफॉर्मचा विस्तार करणे शक्य होणार आहे.
या प्रसंगी आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुनीत छटवाल म्हणाले, “वेलनेस टुरिझम मार्केट सध्या चांगलेच वाढते आहे. त्यात आरोग्य आणि आदरातिथ्य यांचे उत्तम समन्वयन दिसून येते. त्यातही पारंपरिक उपचार आणि उपचारपद्धतींच्या पलीकडे जाऊन पारंपरिक आणि आधुनिकता यांची सांगड अनुभवण्याची प्रवाशांची इच्छा आहे. ग्राहकांच्या या नवनवीन गरजा पूर्ण करून आयएचसीएल आत्मंतनसह प्रवाशांच्या संपूर्ण समाधानासाठी प्रयत्नशील आहे. त्याचा सर्वसमावेशक आणि अनोखा वेलनेस प्रस्ताव, त्याचे सिद्ध व्यवसाय मॉडेल आयएचसीएलच्या ब्रँडस्केपला निश्चितच पूरक आहे.”
ते पुढे म्हणाले, “संस्थापक शर्मिली आणि निखिल कपूर यांच्यासोबतची ही भागीदारी आत्मंतनचे प्रोप्रायटरी प्रोग्रॅम आणि आमच्या पोर्टफोलिओसह जगभरातील निवडक ठिकाणी पर्यटकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयएचसीएलच्या दृष्टिकोनाची पूर्तता करते.”
“आयएचसीएलसोबतची ही भागीदारी जागतिक आरोग्य उद्योगातील एक महत्त्वाचा करार आहे. गेल्या काही वर्षांत एकात्मिक, विज्ञान-समर्थित कार्यक्रमांद्वारे कल्याणाची पुनर्परिभाषा करण्यासाठी आत्मंतन वचनबद्ध आहे, जे सर्वसमावेशक परिवर्तनावर लक्ष केंद्रित करतात. आयएचसीएलचे उत्तम आदरातिथ्य, कौशल्य आणि काळजी तसेच उत्कृष्टतेच्या सामायिक मूल्यांसह, आम्ही ताज इनरसर्कलच्या 1.3 कोटी ग्राहकांच्या आधारे आत्मंतनचे तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास सज्ज आहोत.” आत्मंतन वेलनेस सेंटरचे संस्थापक-संचालक श्री. निखिल कपूर म्हणाले.

“आत्मा म्हणजेच भावना, मन म्हणजेच माइंड; आणि तन म्हणजेच शरीर, यांच्यातील सुसंवाद म्हणजे उत्तम आरोग्य. या विश्वासातून आत्मंतनचा जन्म झाला. आयएचसीएलसोबत भागीदारीनंतरही ज्या विश्वासाने आमचे पाहुणे इथे विश्रांतीसाठी येतात तोच विश्वास जपत अधिक संपन्न अनुभवासह हे स्वप्न साकार करण्याची परवानगी आम्हाला मिळते. एकत्रितपणे, आम्ही येथील अनुभव अधिक सोपा, सुलभ ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवतो, तसेच लक्झरी आणि समग्र कल्याणात नवीन टप्पा गाठतो. आत्मंतनच्या प्रवासातील हा एक नवीन, रोमांचक अध्याय आहे.” आत्मंतन वेलनेस सेंटरच्या संस्थापक-संचालक श्रीमती शर्मिली कपूर.
पुण्याजवळील मुळशी येथे वसलेले आत्मंतन हे भारतातील आघाडीच्या एकात्मिक आरोग्य केंद्रांपैकी एक आहे. मुळशी तलाव आणि सह्याद्री टेकड्यांभोवतीच्या 36 एकरांवर पसरलेल्या या प्रमुख लक्झरी सेंटरमध्ये आयुर्वेद, योग, भारतीय निसर्गोपचार, फिजिओथेरपी, पोषण, समुपदेशन, प्रशिक्षण आणि तंदुरुस्तीवर आधारित अनेक उपयुक्त कार्यक्रम उपलब्ध आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले आत्मंतन हे 2015 मध्ये लाँच झाल्यापासून, सध्याच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या त्रासांवरील उपचारांद्वारे समग्र कल्याण, तणाव व्यवस्थापन, डिटॉक्सिफिकेशन, वजन कमी करणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेसाठी एक प्रमुख ठिकाण ठरले आहे. गोल्ड लीड-प्रमाणित प्रकल्प असलेल्या आत्मंतनचे शाश्वत पद्धतींद्वारे नैसर्गिक परिसराशी सुसंगत राहण्याचे उद्दिष्ट आहे. उत्तम वास्तुकला आणि भारतातील सर्वात मोठ्या सौर गरम पाण्याच्या स्थापनेपासून ते पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या साहित्याच्या वापरापर्यंत, प्रत्येक घटक पर्यावरणीय व्यवस्थापनाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

