मुंबई- नौदल गोदीमध्ये येत्या 24 नोव्हेंबर 2025 रोजी माहे श्रेणीतील (अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट-) उथळ पाण्यातले पाणबुडीरोधी जहाज(एएसडब्ल्यू-एसडब्ल्यूसी) माहे हे पहिले स्वदेशी पाणबुडीरोधक जहाज नौदलात सामील केले जाणार आहे. याद्वारे भारतीय नौदल आपल्या स्वदेशी जहाजबांधणी प्रवासात आणखी एक मैलाचा दगड गाठणार आहे.
कोची स्थित, कोचिन शिपयार्ड लि. ने तयार केलेले माहे, नौदलाच्या जहाज आरेखन आणि निर्मितीतील भारताच्या अत्याधुनिक आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे प्रतिनिधित्व करते. आकाराने लहान तरीही शक्तिशाली असणारे हे जहाज, समुद्रकिनाऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक असलेल्या चपळता, अचूकता आणि सहनशीलता या गुणांचे प्रतीक आहे.
मारक क्षमता, गुप्तता आणि गतीशीलता यांच्या एकत्रीकरणातून, पाणबुड्यांच्या शोधासाठी, किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी आणि भारताच्या महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या जहाजाची रचना करण्यात आली आहे.
80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यात केला आहे. माहे युद्धनौकेची रचना, बांधकाम आणि एकात्मता यांमधील भारताच्या वाढत्या प्रभुत्वाची साक्ष देते. मालाबार तटावर स्थित ऐतिहासिक किनारी शहर माहेच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. या जहाजाच्या शिखरावर ‘उरूमी’ या कलरीपयट्टूमध्ये वापरण्यात येणाऱ्या, चपळता, अचूकता आणि प्राणघातक या गुणांचे प्रतीक असलेली तलवार कोरण्यात आली आहे.
माहे चे जलावतरण, हे आकर्षक, वेगवान आणि दृढनिश्चयी भारतीयाचे उथळ पाण्यातील लढाऊ भारतीय विमानांच्या नव्या पिढीच्या आगमानाचे प्रतीक ठरेल.
NB0I.jpg)

