पुणे-‘कृष्ण वंदना’ – भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांना आणि त्यांच्या दिव्य गुणांना समर्पित
भक्तीमय संध्या – अभिनेत्री व आध्यात्मिक गायिका मुग्धा वीरा गोडसे पुण्यात सादर करत
आहेत. ही विशेष कीर्तन-संध्या प्रथमच पुण्यात 23 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी ५.३० ते
८ वाजेपर्यंत, कालाग्राम, पी. एल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड येथे आयोजित केली आहे.
‘कृष्ण वंदना’ हे मुग्धांचे पहिले भक्तिगीत असून त्याची रचना त्यांच्या पूज्य गुरु श्री ‘तर्नेव’ जी
यांच्या कृपेने झाली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या 108 नावांवर आणि गुणांवर आधारित हे
मौलिक गीत आता सर्व प्रमुख संगीत मंचांवर उपलब्ध आहे.

संध्येची सुरुवात दिव्य मंत्रोच्चारणाने – ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ – होणार असून त्यानंतर
‘कृष्ण वंदना’चे सादरीकरण केले जाईल. अवीरास आणि समूह आपल्या मधुर भजनांनी व
कीर्तनांनी भक्तिमय वातावरण निर्मिती करतील. तसेच प्रख्यात वंशीवादक पं. रवीशंकर मिश्र
सुंदर रागांनी संध्येला आणखी सुमधुर स्पर्श देतील.
कार्यक्रमादरम्यान ‘कृष्ण वंदना’ या पुस्तकाचीही प्रेक्षकांना भेट दिली जाईल. हे पुस्तक
मुग्धांच्या आध्यात्मिक अनुभवांवर आधारित असून राहुल देव यांनी सह-लेखन केले आहे. हे
ग्रंथ त्यांच्या करुणामय गुरु श्री तर्नेव जी यांना समर्पित आहे.
या पवित्र संध्येस प्रवेश विनामूल्य आहे आणि कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात येईल.

