नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघ उपविजेता
पुणे, दि. १६ नोव्हेंबर २०२५: महावितरणच्या २०२५-२६ च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती परिमंडल संघाने वर्चस्व गाजवत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतवर्षी उपविजेता असलेल्या पुणे-बारामती संघाने तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. तर नागपूर-चंद्रपूर-गोंदिया परिमंडल संघाने या स्पर्धेतील उपविजेतेपद मिळविले आहे.
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडासंकुलात दि. १२ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या चार दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धेचा शनिवारी (दि. १५) सायंकाळी समारोप झाला. यावेळी महावितरणचे संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प) व राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्याहस्ते अजिंक्यपदाचा करंडक पुणे-बारामती परिमंडल संघाकडून मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे व श्रीकृष्ण वायदंडे आणि सहकाऱ्यांनी स्वीकारला. तर उपविजेत्या नागपूर-चंद्रपूर-गोंदिया संघाकडून मुख्य अभियंता सुहास रंगारी, दिलीप दोडके, हरीष गजबे व सहकाऱ्यांनी करंडक स्विकारला.
पारितोषिक वितरणच्या कार्यक्रमाला स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके, मुख्य अभियंता राजेश नाईक, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेतील सांघिक व वैयक्तिक विजेते व उपविजेत्यांना करंडक व सुवर्ण/रौप्य पदक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी केले तर अधीक्षक अभियंता सौ. दिपाली माडेलवार यांनी आभार मानले.
मेहनतीचे फळ मिळाले…
पुणे बारामती संघाला गतवर्षी सर्वसाधारण विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. यावर्षी ते मिळविण्यासाठी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी संघातील सहभागी खेळाडुंच्या सरावाकडे विशेष लक्ष दिले. त्यांना सर्व सुविधा पुरविल्या. त्याची फलश्रुती विजेतेपदाने झाली.
सांघिक खेळांमध्ये पुणे-बारामती संघाला – कबड्डी- पुरुष मध्ये प्रथम व महिला संघास द्वितीय, खो-खो- पुरुष संघ प्रथम, बॅडमिंटन – पुरुष व महिला संघ दोघेही प्रथम आले.
वैयक्तिक खेळांमध्ये – १०० मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (प्रथम), २०० मीटर धावणे– पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), ४०० मीटर धावणे- पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती), १५०० मीटर धावणे- पुरुष गट –हर्षल बोंद्रे (प्रथम), महिला गट- संजना शेजल (प्रथम), ४ बाय १०० रिले – पुरुष गट – प्रतीक वाईकर, सोमनाथ कांतीकर, अक्षय केंगाळे, गुलाबसिंग वसावे (प्रथम), गोळा फेक – पुरुष गट –प्रवीण बोरावके (द्वितीय), लांब उडी – पुरुष गट – अक्षय कंगाळे (प्रथम), (अमरावती-अकोला), महिला गट – माया येळवंडे (द्वितीय), बुद्धिबळ – पुरुष गट –संजय देवकाते (द्वितीय), कॅरम- पुरुष गट- संजय कांबळे (द्वितीय), टेनिक्वाईट– महिला दुहेरी – शीतल नाईक- कोमल सुरवसे (प्रथम),
कुस्ती- ६१ किलो- अश्विन मोरे (प्रथम), ६५ किलो – राजकुमार काळे (प्रथम) ७९ किलो- अकिल मुजावर (द्वितीय), ९७ किलो- अमोल गवळी (प्रथम), १२५ किलो – प्रविण बोरावके (प्रथम), शरीरसौष्ठव – ९० किलो–कैलेश्वर सांगवे (द्वितीय), पॉवर लिफ्टिंग –७४ किलो – मनीष कोंड्रा (प्रथम), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भरत वसिष्ठ (प्रथम) पुरुष दुहेरी- भरत वसिष्ठ-पंकज पाठक (प्रथम) महिला एकेरी – अनिता कुलकर्णी (प्रथम) व वैष्णवी गांगरकर (द्वितीय), महिला दुहेरी- वैष्णवी गांगरकर-अनिता कुलकर्णी (द्वितीय)

