पुणे- पेट्रोल भरण्याचे किरकोळ वादातुन शस्त्रे चालवून एकाला जखमी करून हवेत शस्त्रे फिरवीत दहशत माजविणाऱ्या तीन तरुण सराईत आरोपींना पुणे पोलिसांनी २४ तासाच्या आत धुंडाळून अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.१३/११/२०२५ रोजी सायंकाळी विलास पेट्रोल पंप, गुंजन चौक येथे पेट्रोल भरण्याचे किरकोळ वादातुन दाखल गुन्ह्यातील आरोपींनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांना त्यांचेकडील धारदार शस्त्राने वार करुन जखमी करुन पेट्रोल पंप परीसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत जर पोलीसात तक्रार देण्यासाठी गेला तर फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७६४/२०२५ भा.न्या.सं.क. ११८ (१), (३) (५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील आरोपी हे येरवडा पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील असुन त्यांचेवर शरीराविरुध्द व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर घटनेची पोलीसांनी तात्काळ दखल घेऊन आरोपींना शोधण्यासाठी पथक रवाना केले होते. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींना तात्काळ ताब्यात घेणेबाबत वरीष्ठांनी सुचना दिल्या होत्या.
सदर गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करीत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार अतुल जाधव व मुकुंद कोकणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपी हे कल्याणीनगर येथील नदीपात्रात आल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने तपास पथकाचे सहप्रभारी श्रेणी पोउनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार सोगे, जाधव, व कोकणे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचुन संशयित इसम पळुन जाण्याचे तयारीत असताना त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) कृष्णा प्रभाकर नाईक, वय २५ वर्षे, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे २) अक्षय उर्फ आबा सुदाम जमदाडे, वय २५ वर्षे, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे ३) अली रफिक शेख वय २५ वर्षे रा. गांधीनगर, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. नमुद आरोपीस पुढील कारवाईसाठी येरवडा पोलीस स्टेशन येथे आणले असुन पुढील तपास पोलीस अंमलदार तेजपाल जाधव हे करत आहेत..
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०४ सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशनअंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय ठाकर यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहप्रभारी श्रेणी पोलीस उप-निरी.. प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार शिदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल व गायकवाड यांनी केलेली आहे.

