पुणे-
सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड (“कंपनी”) ने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सादर केला आहे.
कंपनी भारत, अमेरिका आणि युरोपमधील मोबिलिटी आणि औद्योगिक बाजारपेठांमध्ये अग्रगण्य ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEMs) साठी नियंत्रण पूरक, उपयोजनांसाठी अत्यावश्यक इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट्स (“ECUs”) चे डिझाईन आणि पुरवठा करते. संपूर्णपणे इन-हाऊस तयार केलेल्या आणि विकसित केलेल्या नवीन नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या उत्पादनांमधून कंपनीला कामकाजातून येणाऱ्या महसुलातील मोठा हिस्सा मिळतो. त्यामुळे कंपनीला अंतिम वापरकर्त्यांना किंवा OEM ग्राहकांना वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण मूल्य देणारी अनन्य उपाययोजना सादर करता येते.
डीआरएचपी नुसार, कंपनी प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे निधी उभारण्याची योजना आखत आहे. संपूर्ण ऑफरमध्ये 8,043,300 पर्यतच्या इक्विटी शेअर्सच्या 100% ऑफर फॉर सेल चा समावेश (“Total Offer Size”) आहे. या ऑफर फॉर सेल मधून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही.
कंपनीचा 30 जून 2025 रोजी संपलेल्या तीन महिन्यांसाठी आर्थिक वर्ष 2025, आर्थिक वर्ष 2024 आणि आर्थिक वर्ष 2023 साठी कामकाजामधून मिळणारा महसूल अनुक्रमे 2,173.57 दशलक्ष रु., 6,583.63 दशलक्ष रु., 5,306.53 दशलक्ष रु. आणि 4,230.28 दशलक्ष रु. इतका होता. त्या कालावधीत/वर्षात नफा अनुक्रमे 170.69 दशलक्ष रु., 470.45 दशलक्ष रु., 58.78 दशलक्ष रु. आणि 85.73 दशलक्ष रु. इतका होता.
भारतामध्ये सेडेमॅक मेकॅट्रॉनिक्स लिमिटेड ही सेन्सरलेस कम्युटेशन (“SLC”) आधारित इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर्स (“ISG”) दोन आणि तीन चाकी (“2/3Ws”) अंतर्गत कंबशन इंजिन (“ICE”) वाहनांसाठी ECUs विकसित, डिझाईन आणि उत्पादन करणारी पहिली कंपनी आहे (स्रोत: CRISIL अहवाल). व्होल्यूमच्या अनुषंगाने कंपनीकडे देशांतर्गत ISG ECU बाजारपेठेचा (2W आणि 3W एकत्र) सुमारे 30% बाजारपेठीय हिस्सा आहे आणि ती आर्थिक वर्ष 2025 मध्ये अग्रणी 4 कंपन्यांमध्ये गणली जाते. कंपनी भारतातील जेनसेट कंट्रोलर्स (“GC”) साठीही आघाडीवर असून तिचा आर्थिक वर्ष 2025 मध्ये बाजारपेठीय हिस्सा 75% पेक्षा जास्त आहे. तसेच कंपनी जागतिक स्तरावर जेनसेट कंट्रोलर्स आणि EFI ECUs ऑफरिंगसह सुमारे 14% जागतिक बाजार हिस्स्यासह अग्रगण्य जागतिक कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे (स्रोत: CRISIL रिपोर्ट).
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, अवेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (BRLMs) आहेत.

