पुणे- ‘रंगयात्री’ या ऑनलाईन आरक्षण सुविधेमध्ये त्रुटी जाणवत असल्याने नाट्य निर्माते, नाट्य व्यवस्थापक व संयोजकांनी ‘रंगयात्री’ ॲपला विरोध करत बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात आज (दि. 12) घंटानाद करून, घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.तर महापालिकेने मात्र रंगयात्रा ॲप – नाट्यगृह बुकिंगसाठी क्रांतिकारी उपक्रम असून,ज्यामुळे दलाल आणि एजंट राज समाप्त होत असल्याचा दावा केला आहे. रंगयात्रा ॲप – नाट्यगृह बुकिंगसाठी क्रांतिकारी उपक्रम असून , कलाकार नाट्य संस्था ,जो कलाकार, नाट्य संस्था पहिल्यादा बुकिंग करतील त्यांना प्राधान्य देऊन नंतर सामाजिक संस्था आणि सर्वांच्या सोयीसाठी १००% पारदर्शक कारभार सर्वांना दाखविणारे ॲप असल्याचा दावा केला आहे. एवढेच नव्हे तर आयुक्त पातळीपर्यंत याचे नियंत्रण असून ॲपमध्ये डॅशबोर्ड सुविधा उपलब्ध असून आयुक्तांना सर्व नाट्यगृहांच्या बुकिंग, महसूल, आणि व्यवहारांचा एकत्रित आढावा तत्काळ मिळतो.असेही म्हटले आहे.
महापालिकेने या ॲप बद्दल केलेले दावे ….
- १००% पारदर्शकता – मोबाइल ॲपद्वारे सर्व नाट्यगृहांचे उपलब्ध सत्र (Sessions) सार्वजनिकरित्या दिसतात. प्रत्येक महिन्याचे वेळापत्रक सर्वांसाठी खुलं.
- सवलतीवरील बुकिंगला आळा – पूर्वी काही नाट्यसंस्था प्रमुख सत्रे मोठ्या प्रमाणात बुक करून 60% सवलतीचा फायदा घेत असत; आता ती प्रथा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.
- दलाल आणि एजंट राज समाप्त – रंगयात्रा ॲपमुळे बुकिंग प्रक्रिया थेट नागरिकांच्या हातात; मध्यस्थांची मक्तेदारी 100% संपली.
- घरबसल्या सोयीस्कर बुकिंग – फक्त दोन क्लिकमध्ये नाट्यगृह आरक्षण तसेच डिपॉझिट आणि भाडे भरता येते.
- पूर्णतः ऑनलाइन प्रणाली – सर्व व्यवहार व प्रक्रिया ॲपवर असल्याने प्रशासकीय हस्तक्षेप पूर्णतः बंद.
- कागदविरहित प्रक्रिया – कागदपत्रे, रिफंड किंवा रद्दीकरण प्रक्रियेसाठी स्वतंत्र कार्यालयात येण्याची गरज नाही; सर्व सेवा मोबाइलवर उपलब्ध.
- एकच डिपॉझिटवर अनेक बुकिंगला आळा – पूर्वी एकाच डिपॉझिटवर अनेक आरक्षणे होत असत ज्यामुळे सामान्य नागरिकांना सत्रे मिळत नसत; आता सर्वांसाठी न्याय्य संधी उपलब्ध झाली आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी
- जीएसटी रिपोर्टिंग सुलभ – ॲपद्वारे सर्व व्यवहारांचे जीएसटी रिपोर्ट स्वयंचलित तयार; हाताने कष्ट घेण्याची गरज नाही.
- बँकेत जाण्याची गरज संपली – उन्हात, पावसात बँकेत चकरा मारण्याऐवजी सर्व पेमेंट प्रक्रिया ऑनलाइन.
- दबाव आणि धमकीपासून मुक्तता – ॲपमुळे पूर्ण व्यवहार प्रणाली पारदर्शक असल्याने कोणत्याही बाह्य दबावाची भीती नाही.
- वेळ आणि पैशाची बचत – डिजिटल प्रक्रियेने दोन्ही घटकांची मोठ्या प्रमाणात बचत.
- सर्व नाट्यगृहांचे एकत्रित जीएसटी – आधी प्रत्येक नाट्यगृहाचा वेगळा जीएसटी नंबर व भरणा होता; आता एकाच क्लिकमध्ये सर्व डेटा संकलित व सादर.
- आयुक्त पातळीपर्यंत नियंत्रण – ॲपमध्ये डॅशबोर्ड सुविधा उपलब्ध असून आयुक्तांना सर्व नाट्यगृहांच्या बुकिंग, महसूल, आणि व्यवहारांचा एकत्रित आढावा तत्काळ मिळतो.


