पुणे- शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी मतदार याद्यांसंदर्भात माहिती विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या सत्रात इच्छुक उमेदवारांना व कार्यकर्त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे समन्वयक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाचे डॉ.निमिष साने यांनी मार्गदर्शन केले.
शुक्रवार दि. १४/११/२०२५ रोजी निवडणुक आयोगाच्या वतीने मतदार याद्या जाहिर होणार आहेत. सदर मतदार याद्यामध्ये दुबार नावे कशी शोधायची, बुथ निहाय याद्या कशा तपासाव्या, इ. संदर्भात डॉ. निमिष साने यांनी माहिती दिली. त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या उपस्थित मतदार यादीतील दुबार नावे, खोटे मतदार, चुकीचे पत्ते, मयत मतदार, शेजारील प्रभागातील मतदारांचे समावेश यावर कसे काम करायचे याची महत्वपूर्ण सविस्तर माहिती दिली.
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आपले नेते आदरणीय राहुल गांधी यांनी मत चोरीचा शोध घेऊन त्या विरोधात जाहीरपणे परखड मत सर्वांसमोर मांडले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदार याद्या या काळजीपूर्वक अभ्यासने गरजेचे आहे. त्यावरील त्रुटी, चुका तपासण्याचे काम प्रामुख्याने उमेदवारांनी केलेच पाहिजे.’’यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या सह प्रदेश पदाधिकारी, माजी आमदार, माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, शहर पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

