पुणे, : अंतर्गत ज्वलन इंजिन, जनरेटर सेट आणि कृषी उपकरणे यांच्या उत्पादनातील आघाडीची कंपनी, आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लक्षणीय उपस्थिती असलेल्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (KOEL) (BSE: 533293; NSE: KIRLOSENG) 31 मार्च 2026 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे अलेखापरिक्षित आर्थिक निकाल जाहीर केले.
या निकालांबाबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर म्हणाल्या, “किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडने (KOEL) आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. जी कंपनीच्या वाढीच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे. तिमाहीत प्रथमच आम्ही ₹ 1,500 कोटी महसूलाचा टप्पा ओलांडला आणि ₹ 3,027 कोटींची आमची आतापर्यंतची सहामाहीतील सर्वोच्च विक्री गाठली. मार्केटमधील आमची मजबूत स्थिती आणि ऑपरेशनल उत्कृष्टता दर्शवत स्वतंत्र व्यवसायातील सर्व विभागांनी दुहेरी अंकी वाढ नोंदवली. पॉवर जनरेशन बिझनेस युनिटने देखील त्यांची मजबूत कामगिरी सुरू ठेवली असून त्याला आमचे विस्तृत वितरण नेटवर्क, मजबूत ब्रँड इक्विटी आणि इंजिन तसेच जनरेटर तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण नवोपक्रमाचे समर्थन मिळाले.
10 ऑक्टोबर रोजी, आम्ही आमच्या B2C ऑपरेशन्सची धोरणात्मक पुनर्रचना देखील जाहीर केली. आमची पूर्ण मालकीची उपकंपनी, ला-गज्जर मशिनरीज प्रायव्हेट लिमिटेडला स्लम्प सेलद्वारे हा व्यवसाय हस्तांतरित केला. हे पाऊल आमचे लक्ष्य अधिक बळकट करते आणि 2030 पर्यंत $2 अब्जच्या टॉप लाईनपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. या प्रगतीमुळे आणि ध्येय निश्चित असल्याने शिस्त आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीच्या माध्यमातून धोरणात्मक प्राधान्ये पूर्ण करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळते.”
आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र):
· वार्षिक 35% वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ विक्री ₹ 1,593 कोटी; आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ती ₹1,184 कोटी एवढी होती.
· आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA# ₹ 214 कोटींवर तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹148 कोटी एवढा होता. वार्षिक वाढ 45%
· आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत EBITDA# मार्जिन 13.4% एवढे होते. तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ते 12.4% होते.
· वार्षिक 44% वाढ नोंदवत आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा ₹141 कोटी होता. आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹98 कोटी एवढा होता.
· रोख आणि रोख समतुल्य* ₹ 475 कोटी
* कर्जाचे एकूण प्रमाण; ट्रेझरी गुंतवणूक समाविष्ट आहे तर दावा न केलेले लाभांश वगळले आहेत.
आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित):
· वार्षिक 30% वाढ नोंदवत चालू कामकाजातून मिळणारा महसूल आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹1,948 कोटी एवढा होता. आर्थिक वर्ष 25च्या दुसऱ्या तिमाहीत तो ₹1,499 कोटी होता;
· चालू कामकाजातून# मिळणारा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹159 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाहीत ₹ 106 कोटी होता; वार्षिक 51% वाढ
आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (स्वतंत्र):
· आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ विक्री ₹3,027 कोटी झाली तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ती ₹2,518 कोटी झाली; वार्षिक 20% वाढ
· आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत EBITDA# ₹405 कोटी एवढा तर आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या सहामाहीत तो ₹323 कोटी एवढा होता; वार्षिक 25% वाढ
· आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत EBITDA# मार्जिन 13.3% होते तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ते 12.7% एवढे होते.
· आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा# ₹264 कोटींवर गेला तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत तो ₹215 कोटी एवढा होता; वार्षिक 23% वाढ
आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीतील आर्थिक कामगिरीचा आढावा (एकत्रित):
· आर्थिक वर्ष 26च्या पहिल्या सहामाहीत चालू कामकाजातून मिळणारा महसूल ₹3,712 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत तो ₹3,130 कोटी एवढा होता; वार्षिक 19% वाढ नोंदवली गेली.
· चालू कामकाजातून# मिळणारा निव्वळ नफा आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाहीत ₹293 कोटी होता तर आर्थिक वर्ष 25च्या पहिल्या सहामाहीत ₹238 कोटी एवढा नफा झाला होता. वार्षिक 23% वाढ
– वर नोंदवलेला निव्वळ नफा आणि EBITDA, जिथे लागू असेल तिथे अपवादात्मक बाबी वगळून आहे.
– # मागील कालावधीतील आकडेवारीमध्ये मागील वर्षांत केलेल्या विक्रीसाठी ग्राहकासाठी केलेल्या थकीत प्राप्तीसाठीचे रिव्हर्सल प्रोव्हिजन वगळले आहे. चालू कालावधीत असे कोणतेही रिव्हर्सल नाही. मागील कालावधीसाठी म्हणजेच Q2 FY 25 आणि H1 FY 25 साठी रिव्हर्सल संख्या खालीलप्रमाणे आहेत:
– EBITDA मार्जिन, स्वतंत्र पातळीवर, अनुक्रमे 13.9% आणि 14.4% होते.
– एकत्रित पातळीवर, निव्वळ नफा अनुक्रमे ₹125 कोटी आणि ₹281 कोटी होता.
– तपशीलांसाठी, कृपया स्टॉक एक्स्चेंजवर प्रकाशित झालेल्या ‘अनऑडिटेड आर्थिक निकालांची नोंद‘ पहा.

