• कामकाजामधून मिळणारा महसूल 2,270 कोटी रु., वार्षिक 13.4% वाढ
• EBITDA मार्जिन 19.3%, EBITDA 439 कोटी रु., वार्षिक 15.2% वाढ
• PAT 251 कोटी रु., वार्षिक 24.7% वाढ
• स्थानिक व्यवसाय विक्री 1,031 कोटी रु., वार्षिक 10.6% वाढ
• आंतरराष्ट्रीय व्यवसाय विक्री 1,238 कोटी रु., वार्षिक 15.8% वाढ
पुणे: एमक्योर फार्मास्युटिकल्स (BSE:544210, NSE: EMCURE) तर्फे 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी आपले एकत्रित आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले.
या तिमाहीत कंपनीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही व्यवसायांमध्ये मजबूत कामगिरी झाली.
स्थानिक व्यवसायात 10.6% वाढ नोंदवली गेली असून, सर्व प्रमुख उपचार विभागांतील मजबूत कामगिरी आणि नव्या उपक्रमांमुळे ही वाढ साध्य झाली. देशांतर्गत व्यवसाय हा कंपनीसाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि आम्ही सातत्याने आमचा उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत असून व्यवसायासाठी टीम मजबूत करत आहोत. अलीकडेच कंपनीने नोवो नॉर्डिस्क सोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली असून त्याअंतर्गत पोविझ्ट्रा® हे जैविक इंजेक्टेबल सेमाग्लूटाइड भारतात सादर करण्यात येणार आहे. या कराराचा एक भाग म्हणून एमक्योर ही पोविझ्ट्राच्या व्यवसायीकरण आणि प्रसारासाठी जबाबदार असलेली एकमेव वितरक कंपनी असेल. पोविझ्ट्रा® हे जास्त वजन असलेल्या किंवा स्थूलतेने ग्रस्त व्यक्तींमध्ये दीर्घकालीन वजन व्यवस्थापन आणि स्थूलतेमुळे उद्भवणाऱ्या हृदयविकारांशी संबंधित गंभीर जोखीम कमी करण्यासाठी सुचवलेले औषध आहे. या तिमाहीत कंपनीने आपल्या झुवेंटस या उपकंपनीतील अल्प भागभांडवलाचे अधिग्रहणही पूर्ण केले.
आंतरराष्ट्रीय व्यवसायातही मजबूत वाढ दिसून आली असून 16% वाढ नोंदवली गेली. नवीन उत्पादन सादरीकरण आणि मॅन्क्स (Manx) युनिटच्या वाढत्या उत्पादनामुळे युरोपमध्ये 23% वाढ झाली. कॅनडामध्ये व्यवसायाने 18% वाढ कायम ठेवली आहे. जगातील उर्वरित भागातील व्यवसायात नॉन-एआरव्ही व्यवसायाच्या आधारावर स्थिर गती दिसून आली.
निकालांवर भाष्य करताना एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मेहता म्हणाले, “दुसऱ्या तिमाही मध्ये आमच्या सर्व व्यवसायांनी मजबूत कामगिरी केली. आम्ही आमच्या लक्ष केंद्रीत केलेल्या बाजारपेठांमध्ये परवाना करार आणि इन-हाऊस विकासाद्वारे आमचा पोर्टफोलिओ वाढवत आहोत. नोवो नॉर्डिस्क सोबतची भागीदारी आम्हाला वेगाने वाढणाऱ्या स्थूलता उपचार विभागात मजबूत स्थान मिळवून देत असून बाजारपेठेला आकार देण्यासाठी आम्हाला सक्षम करण्याकरता लवकर प्रवेश मिळवून देत आहे. आम्ही आमच्या सर्व प्रमुख व्यवसायांमध्ये मजबूत वाढ आणि मार्जिन सुधारणा सादर करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.”

