~ 1,000 हून अधिक थेट रोजगार निर्मितीचे तसेच जागतिक फिनटेक उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख निर्माण करण्याचे उद्दिष्ट
~ अॅक्सिस बँक, व्हिसा, मास्टरकार्ड आणि एफपीएल टेक्नॉलॉजीज (वनकार्ड) सोबत एफसीएसची भागीदारी
मुंबई – प्रीमियम मेटल आणि टिकाऊ पेमेंट कार्ड्समध्ये जागतिक स्तरावर आघाडीवर असलेल्या फेडरल कार्ड सर्व्हिसेसने (एफसीएस) तंत्रज्ञान, रिअल इस्टेट आणि सेवा या तीन प्रमुख व्यवसायांमधील 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह भारतातील विस्ताराची घोषणा आज केली. या अंतर्गत महाराष्ट्रातील पुणे येथे भारतातील पहिले उत्पादन केंद्र स्थापन केले जाणार आहे. हा नवीन प्लांट 100% मेटल कार्ड आणि बायोडिग्रेडेबल कार्ड्सचे उत्पादन करेल. भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या फिनटेक मॅन्युफॅक्चरिंग परिसंस्थेतील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या गुंतवणुकीचा एक भाग म्हणून, भारताची फिनटेक पुरवठा साखळी मजबूत करणे, 1,000 हून अधिक थेट नोकऱ्या निर्माण करणे आणि भारताच्या ‘मेक इन इंडिया‘ तसेच पर्यावरणपूरक दृष्टिकोनाशी सुसंगत शाश्वत उत्पादन पद्धतींचा अवलंब करणे हे एफसीएसचे उद्दिष्ट आहे.

धोरणात्मकदृष्ट्या पुण्याची करण्यात आलेली निवड ही अनेक घटकांवर आधारित आहे: मुंबईपासून जवळ, प्रगत उत्पादन आणि फिनटेक सोल्यूशन्ससाठी आवश्यक असे कुशल मनुष्यबळ आणि आशिया, मध्य पूर्व तसेच युरोपमधील प्रमुख बाजारपेठांशी जोडले जाण्यासाठी या भागाची लॉजिस्टिक क्षमता. 32,000 चौरस फूट आकारावरील या केंद्राचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर, फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होणाऱ्या ऑपरेशन्सपूर्वी एफसीएस उपकरणांचे कॅलिब्रेशन आणि कामगार प्रशिक्षण यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरवर्षी 20 दशलक्ष कार्ड्सच्या प्रारंभिक क्षमतेसह हे केंद्र सुरू होईल, जे दरवर्षी 26.7 दशलक्ष कार्ड्सची निर्मिती करेल. या गुंतवणुकीद्वारे, प्रगत आणि शाश्वत उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्याचे एफसीएसचे उद्दिष्ट आहे. कंपनी सध्या अॅक्सिस बँक, व्हिसा, मास्टरकार्ड आणि एफपीएल टेक्नॉलॉजीज (वनकार्ड) सोबत काम करते.
फेडरल कार्ड सर्व्हिसेसचे (एफसीएस) सीईओ मॅटियास गेन्झा युर्नेकियन म्हणाले, “जागतिक स्तरावरील विस्ताराच्या आमच्या पुढील टप्प्यात भारत केंद्रस्थानी आहे. त्याची मजबूत फिनटेक इकोसिस्टम, उत्कृष्ट अभियांत्रिकी आणि उत्पादन क्षमतांसह, शाश्वत नवोपक्रम वाढवण्यासाठी भारत उत्तम पाया तयार करून देतो. बांधणी, डिझाइन आणि पेमेंट सोल्यूशन्ससाठी भारताने जगाला केलेल्या दीर्घकालीन वचनबद्धतेची ही गुंतवणूक सुरुवात आहे. आम्ही भारताकडे केवळ एक बाजारपेठ म्हणून पाहत नाही, तर नवोपक्रम, प्रतिभा आणि जबाबदार उत्पादनासाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून पाहतो.”
एफसीएसने उत्पादित केलेले आणि नवनवीन पर्यायांच्या साहाय्याने तयार केलेले हे कार्ड पीव्हीसी प्लास्टिकला एक क्रांतिकारी पर्याय ठरत आहेत. भविष्यातील शाश्वत कार्ड सोल्यूशन्समध्ये प्रमाणित लाकूड, कॉफी फायबर आणि इतर वनस्पती-आधारित कंपोझिट्स अशा अक्षय्य स्रोतांपासून विकसित केलेल्या बायोडिग्रेडेबल मटेरियलचा समावेश आहे. हे कार्ड बायोडिग्रेडेबल असून कोणत्याही परिस्थितीत टिकतील अशा पद्धतीने डिझाइन केलेली आहेत.
मॅटियास पुढे म्हणाले:
“शाश्वत साहित्याकडे वळणे ही जागतिक स्तरावर सर्वांची सामायिक जबाबदारी आहे. पीव्हीसी आणि पॉली कार्बोनेटला सुरक्षित आणि नावीन्यपूर्ण बायोडिग्रेडेबल पर्याय देऊन एफसीएस आपली भूमिका बजावण्यास उत्सुक आहे. सरकार आणि व्यावसायिक भागीदारांसोबत काम करून, आम्ही पेमेंट उद्योगासाठी अधिक शाश्वत आणि जबाबदार भविष्य घडवण्यास मदत करू शकतो असा आमचा विश्वास आहे.”
जागतिक नवोपक्रमाचा वारसा
या विस्तारासह एफसीएस इंडिया अमेरिकेत सुरू झालेल्या वाढीच्या प्रवासाला पुढे नेत आहे. सध्या प्रीमियम कार्ड उद्योगात स्थापित क्षमता आणि पेटंट पोर्टफोलिओच्या बाबतीत एफसीएस यूएसए ही जगभरातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आहे. आयर्लंडमध्ये कंपनीचा स्वतःचा संशोधन आणि विकास विभाग आहे. तसेच ओहायो, यूएसए येथे एकत्रित उत्पादन केंद्रे आहेत. तिचे जागतिक मुख्यालय मियामी येथे तर प्रशासकीय कार्यालये अर्जेंटिनामध्ये आहेत. तिच्या या विस्तारातूनच तिची व्यापक पोहोच आणि सांस्कृतिक विविधता लक्षात येते.
भारतात केलेल्या गुंतवणुकीसह, पेमेंट सोल्यूशन्स उद्योगात नावीन्यपूर्णता, टिकाऊपणा आणि उच्च-स्तरीय डिझाइनमध्ये एफसीएस तिचे जागतिक नेतृत्व मजबूत करत आहे. ते पाचही खंडांमध्ये कार्यरत आहे आणि 100 हून अधिक ग्राहकांना सेवा देते.

