पुणे, दि. 11 नोव्हेंबर: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते. रब्बी हंगाम 2025-26 साठी गहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग पिकांचा सहभाग करण्यात आला आहे. विमा सहभाग नोंदणीकरिता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरु करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाईच्या माहितीसाठी केंद्रशासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्र.14447 वर संपर्क करावा. भारतीय कृषि विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. सविस्तर माहितीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर शासन निर्णय पाहता येईल.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्वारी पिकासाठी 30 नोव्हेंबर, गहू, हरभरा व कांदा पिकासाठी 15 डिसेंबर, 2025 आणि उन्हाळी भुईमूग पिकासाठी 31 मार्च, 2026 पर्यंत अंतिम मुदत राहील.
शेतकऱ्यांनी नजिकच्या ई-सेवा केंद्र, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. शेतकऱ्यांनी संबंधित उपविभागीय कषि अधिकारी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

