मुंबई , १९ जानेवारी २०२४ : अयोध्येमध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनाचे शुभ कार्य आरंभ झाले आहे. ह्या शुभ कार्यामध्ये भर देण्याचे कार्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आहे . मनसे ही राजसाहेब ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बऱ्याच ज्वलंत मुद्द्यांवर आवाज उठवत आली आहे. मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना प्राण प्रतिष्ठापने निमित्त अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पत्र लिहिलं आहे.
ह्या पत्रात शालिनी ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत . प्राण प्रतिष्ठापना निमित्त अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे . महाराष्ट्राचा रामायणाशी घनिष्ट संबंध आहे. श्री राम यांच्या वनवासातील बराच कालावधी त्यानीं पंचवटी मध्ये घालवला होता . त्याचबरोबर रामायणातील सर्वात महत्त्वाच्या घटना ह्या देखील पंचवटीत घडल्या आहेत. तसेच राम मंदिराचे उद्घाटन हे हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचे दीर्घकाळचे स्वप्न होते. त्यांच्या एका हाकेवर कारसेवक मंदिराच्या चळवळीत शामिल झाले हॊते. ह्या चळवळीमध्ये बऱ्याच कारसेवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे.
राजसाहेब ठाकरे यांनी देखील भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी हिंदूंची स्वप्ने साकार करण्यासाठी कारसेवकांच्या बलिदाना बद्दल अनेकदा भाष्य करून आभार मानले आहेत. कारसेवकांचे बलिदान सर्वांना स्मरणात आणून देण्यासाठी शालिनी ठाकरे यांनी या पत्राद्वारे ते कार्य संपन्न केले आहे