पुणे :
गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक ज्योतिष महोत्सव दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यातील हॉटेल प्रेसिडेंट (कर्वे रस्ता) येथे उत्साहात झाला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत पार पडलेल्या या दिवसभराच्या कार्यक्रमात देशभरातील नामवंत ज्योतिषी, वास्तुशास्त्रज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल चांदवडकर (नाशिक) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पं. विजय जकातदार होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून वेदमूर्ती पं. नंदकुमार जोशी यांनी उपस्थिती लावली. प्रमुख अतिथी म्हणून अतुलशास्त्री भगरे गुरुजी (नाशिक), वास्तुमहर्षी रमेश पलंगे, पं. दिलीप अवस्थी, सौ. पुष्पलता शेवाळे, डॉ. सौ. जयश्री बेलसरे, सौ. जानकी पाचर्णे, रोहित वर्मा आणि सौ. शुभांगिनी पांगारकर यांनी सहभाग घेतला.गौरी केंजळे,कैलास केंजळे यांनी स्वागत केले.अपर्णा गोरेगावकर यांनी सूत्रसंचालन केले.अनेक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात कै. मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार २०२५ डॉ. चंद्रकांत शेवाळे (दादा) यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन ज्योतिष संशोधन कार्याची दखल घेत संस्थेने हा सन्मान दिला.दिवसभरात चार सत्रांमधून विविध विषयांवरील व्याख्याने आणि चर्चासत्रे घेण्यात आली.
अतुलशास्त्री भगरे म्हणाले,’ज्योतिष शास्त्र हा समस्या जाणून घेण्याचे आणि दुःख दूर करण्यासाठी मार्ग सांगणारे शास्त्र आहे.त्याचा अभ्यास करीत राहिले पाहिजे.संशोधन करीत राहिले पाहिजे.अशा मेळाव्यातून ज्योतिषाचार्यानी एकत्र येत राहिले पाहिजे आणि संवाद होत राहिला पाहिजे.अनिल चांदवडकर म्हणाले,’या क्षेत्रातील नवे जाणून घेतले पाहिजे आणि जगातील ज्ञानाच्या सागरातुन थोडे थोडे घेत ज्ञान राहिले पाहिजे.चंद्रकांत शेवाळे म्हणाले,’जुन्या काळात वैदिक ज्योतिष हाच एक विषय होता.वैदिक ज्योतिष ही जननी आहे.आता ज्योतिष वर्तविण्याचे प्रवाह वाढले असून संशोधन होत राहिले पाहिजे.संस्थात्मक काम पुढे गेले पाहिजे.रमेश पलंगे म्हणाले पूर्वीच्या कालबाह्य परिभाषा आणि शब्द बदलून नवे शब्द ज्योतिष शास्त्रात रूढ केले पाहिजेत.
चर्चासत्रातून विचार मंथन
महोत्सवात विविध विषयांवर चर्चासत्रे पार पडली. पहिल्या सत्रात सौ. कविता काळे यांनी ‘झटपट पैसा कसा बघाल’, निलेश खरे यांनी ‘कस्पल इंटरलिंक’, सौ. सुषमा पलंगे यांनी ‘वास्तूतील अंतर्गत रचना’, तर गणेशशास्त्री शुक्ल यांनी ‘कवडीशास्त्र’ या विषयांवर मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन अपर्णा गोरेगावकर यांनी केले.दुसऱ्या सत्रात प्रदीप पंडित यांनी ‘अष्टकवर्ग कालनिर्णय’, अरुण खंदारे यांनी ‘ग्रहगतींचे गणित’ आणि सौ. पल्लवी चौहान यांनी ‘जुळ्या मुलांच्या कुंडल्या’ या विषयांवर चर्चा केली.
तिसरे सत्र ‘गोष्टी सांगू युक्तीच्या’ या मनोरंजक शैलीत पार पडले. कांतीलाल मुनोत, सौ. गौरी केंजळे, ॲड. सुनिता पागे, ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, डॉ. सौ. शिल्पा अग्निहोत्री आणि डॉ. निलेश बी. कुलकर्णी यांनी अनुभवकथनातून ज्ञानवर्धन केले.चौथे सत्र ‘पौष्टिक खिचडी’ या नावाने विविध आधुनिक व पारंपरिक विषयांचा संगम ठरले. एड. मालती शर्मा, डॉ. स्मिता गिरी, जितेंद्र वझे, मुग्धा पत्की, डॉ. श्यामला वाघ, संदीप सवाई, सौ. वैशाली साठे, सौ. अपर्णा पैठणकर आणि प्रसन्न भिडे यांनी वास्तूतील ऊर्जा, कृष्णमूर्ती पद्धत, पुनर्जन्म, उपाय-उपासना आणि ग्रहांची युती यांसारख्या विषयांवर विचार मांडले.सायंकाळी समारोप सत्रात आदिनाथ साळवी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमाणपत्र वितरण आणि विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी कार्यक्रमाचा समारोप झाला.
या प्रसंगी उपस्थित ज्योतिषप्रेमींसाठी विशेष लॉटरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून पाच भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. सर्व उपस्थितांना ‘फलादेशाचे तंत्र’ हे पुस्तक स्मृतिचिन्ह म्हणून भेट देण्यात आले.हा संपूर्ण महोत्सव ज्योतिष, वास्तु आणि अध्यात्माच्या रसिकांसाठी ज्ञान, प्रेरणा आणि आनंदाचा अनोखा मेळ ठरला. गौरीकैलास ज्योतिष संस्था पुणे यांनी आयोजित केलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय आणि ज्ञानप्रद ठरल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

