‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट’रोहित पवारांचा घणाघात
पुणे-राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्याच्यावर मात्र कारवाई होते. सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको घोटाळ्याप्रकरणी कारवाई झाली नाही, पण पार्थ पवार यांच्या प्रकरणी सुपरफास्ट कारवाई केली जात आहे, असा भेदभाव न करता कारवाई करण्यात यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
“गुन्हेगारांना जामीन – नेत्यांना जमीन” सरकारची नवी योजना फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत राबविली जात असून भाजपच्या घोटाळेबाजांना त्वरित क्लीन चीट दिली जातेय तर मित्रपक्ष आणि अन्य पक्षातील घोटाळेबाजांना पॉलिटिकल स्कोर सेटल होईपर्यंत आणि पॉलिटिकल बार्गेनिंग होईपर्यंत चौकशीचा बनाव केला जातो आहे आणि अशा प्रकारे ‘आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्ट’ ही कार्यपद्धती फडणवीस सरकार राबवीत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे..

