एअर इंडिया एक्सप्रेस १ December २०२५ पासून नागपूरबेंगळुरूदरम्यान दिवसातून दोन फ्लाइट्स चालवणार आहे. तसेच, २ December २०२५ पासून दिल्ली आणि पुणेहून अबू धाबीला नवीन फ्लाइट्स सुरू करण्यात येणार आहेत.
पुणे-: भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय व्हॅल्यू कॅरिअर एअर इंडिया एक्सप्रेस आपल्या वाढत्या नेटवर्कमध्ये नागपूरचा समावेश करत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या दोन महिन्यांत एअर इंडिया एक्सप्रेसने 5 नवीन स्टेशनची भर घातली असून, नेटवर्कवरील एकूण गंतव्यस्थानांची संख्या 60 झाली आहे. 01 डिसेंबर 2025 पासून एअर इंडिया एक्सप्रेस नागपूर – बेंगळुरू दरम्यान दिवसातून दोन उड्डाणे सुरू करणार आहे. या नवीन उड्डाणांसाठी बुकिंग्स एअरलाइनच्या पुरस्कारप्राप्त वेबसाइट airindiaexpress.com, अधिकृत मोबाइल अॅप आणि प्रमुख बुकिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.
त्याचबरोबर, एअर इंडिया एक्सप्रेस खाडी नेटवर्कचा विस्तार करत आहे. 02 डिसेंबर 2025 पासून एअरलाइन दिल्ली – अबू धाबी मार्गावर आठवड्यात चार उड्डाणे आणि पुणे – अबू धाबी मार्गावर आठवड्यात तीन उड्डाणे सुरू करणार आहे. यामुळे भारत आणि यूएई दरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी बळकटी मिळणार आहे.
| Schedule effective from December 1, 2025 (all timings are local) | ||||
| Departure Airport | Arrival Airport | Departure Time | Arrival Time | Frequency |
| Nagpur | Bengaluru | 10:00; 21:05 | 12:05; 23:10 | 2X Daily |
| Bengaluru | Nagpur | 07:25; 18:30 | 09:30; 20:35 | 2X Daily |
| Schedule effective from December 2, 2025 (all timings are local) | ||||
| Delhi | Abu Dhabi | 10:10 | 12:40 | Tue, Wed, Thu, Sat |
| Abu Dhabi | Delhi | 13:40 | 19:10 | Tue, Wed, Thu, Sat |
| Pune | Abu Dhabi | 20:50 | 22:45 | Tue, Thu, Sat |
| Abu Dhabi | Pune | 23:45 | 04:15 | Tue, Thu, Sat |
नागपूरचा समावेश महाराष्ट्रातील एअर इंडिया एक्सप्रेसची उपस्थिती अधिक मजबूत करतो. सध्या एअरलाइन मुंबईतून आठवड्याला 130 पेक्षा जास्त आणि पुणेतून आठवड्याला 90 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते. आता एअर इंडिया एक्सप्रेस नवी मुंबई विमानतळावरूनही सेवा सुरू करणार असून, येथून आठवड्याला 35 उड्डाणे बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांकडे चालतील.
नागपूर – बेंगळुरू या नवीन उड्डाणांमुळे एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच बेंगळुरूहून सुरू केलेल्या मार्गांना पूरक ठरेल. यामध्ये अहमदाबाद, चंदीगड, देहरादून, जोधपूर आणि उदयपूर या शहरांपर्यंतच्या नवीन मार्गांचा समावेश आहे. त्यामुळे बेंगळुरू हे एअर इंडिया एक्सप्रेसच्या जलद वाढणाऱ्या नेटवर्कमधील एक महत्त्वाचे हब म्हणून अधिक बळकट होत आहे. सध्या एअरलाइन बेंगळुरूतून आठवड्याला 530 हून अधिक उड्डाणे चालवते. एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच बेंगळुरूहून बँकॉक, जेद्दा, कुवैत आणि रियाध या आंतरराष्ट्रीय गंतव्यांपर्यंत थेट उड्डाणे देखील सुरू केली आहेत. दिल्लीहून एअर इंडिया एक्सप्रेस आठवड्याला 400 पेक्षा जास्त उड्डाणे चालवते, ज्याद्वारे 25 देशांतर्गत गंतव्यस्थानांना थेट जोडले जाते. तसेच, अबू धाबी आणि शारजाह (यूएई) आणि मस्कत (ओमान) येथेही फ्लाइट्स उपलब्ध आहेत.
एअर इंडिया एक्सप्रेसने अलीकडेच आपली नवी ब्रँड मोहीम ‘Xplore More, Xpress More’ सादर केली आहे. या मोहिमेचा उद्देश प्रवाशांना स्थानिक संस्कृती अनुभवण्यास, नवीन ठिकाणे शोधण्यास आणि प्रवासातील आनंद वाढवण्यास प्रोत्साहन देणे असा आहे. यासोबतच एअरलाइनने आपल्या Boeing 737-8 विमानाचे नवे इंटिरियर देखील सादर केले आहे. नव्या केबिनमध्ये अधिक मऊ आणि आरामदायी सीट्स, रुंद आर्मरेस्ट्स आणि 29 ते 38 इंच पर्यंत लेगरूम दिली आहे. प्रत्येक सीटमध्ये USB चार्जिंग पोर्ट असून, केबिनमध्ये गरम ‘Gourmair’ जेवणासाठी ओव्हनची सुविधा आहे. नव्या कार्पेट्स, ताजेतवाने इंटिरियर आणि Boeing Sky Interior लाईटिंगमुळे केबिन अधिक आधुनिक, उबदार आणि स्वागतार्ह वाटते — प्रवाशांना आरामदायी आणि स्मरणीय प्रवासाचा अनुभव देण्याच्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे.
एअरलाइनची आणखी एक महत्त्वाची उपक्रम — ‘Tales of India’ — भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक वैविध्याचा उत्सव साजरा करतो. या अंतर्गत विमानांच्या टेल फिन्सवर देशातील विविध प्रांतांची कला दाखवली जाते. यात 50 हून अधिक स्थानिक आणि पारंपरिक कला, 25 राज्यांतील कलाकृतींचा समावेश आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली चित्रशैली, तसेच अप्रतिम हिमरू आणि पैठणी विणकामाचा देखील समावेश आहे.

