पुणे: वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून जम्मू-काश्मीरमधील जवानांना फराळ वाटप करण्यात आला. काश्मीरच्या श्रीनगरमधील लाल चौक, हरिसिंग स्ट्रीट, पंचमुखी हनुमान मंदिर यासह सीमेवर तैनात जवानांना दिवाळी फराळ देऊन वंदे मातरम् संघटनेने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच कार्तिक पौर्णिमा आणि वैकुंठ चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर येथे कायमस्वरूपी बसवलेल्या गणपतीची विधिवत पूजा व भंडारा संपन्न झाला. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, भारतमाता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी वंदे मातरम् संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सचिन जामगे, आयटी व माहिती अधिकार अध्यक्ष विशाल शिंदे, संपर्क प्रमुख अमोल भुरेवार, मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व जवान तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंदे मातरम् संघटनेच्या टीमकडून काश्मीरमधील जवानांना फराळ
Date:

