मुंबई, 06 नोव्हेंबर 2025: भारतातील अग्रगण्य मॉड्युलर फर्निचर उत्पादक आणि ब्रँड स्पेसवुड फर्निशर्स प्रा. लि. (“स्पेसवुड”) ने भारतातील ग्राहक-केंद्रित आणि ग्रोथ-स्टेज व्यवसायांमध्ये गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या A91 पार्टनर्स या नामांकित प्रायव्हेट इक्विटी फर्मकडून 300 कोटी रु.चा निधी उभारला आहे.
या गुंतवणुकीमुळे A91 पार्टनर्सला स्पेसवुड मध्ये महत्त्वाचा मायनॉरिटी स्टेक मिळाले असून या निधीच्या माध्यमातून कंपनी विस्तार, ब्रँड उभारणी आणि कामकाज आणखी मजबूत करणे हा आपला पुढील वाढीचा टप्पा अधिक वेगाने पार पाडणार आहे.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना स्पेसवुडचे सह-संस्थापक आणि संचालक श्री. किरीट जोशी म्हणाले:
“A91 पार्टनर्स आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. भांडवलाच्या पलीकडे जात कंझ्युमर ब्रँड्स विस्तारण्याचा मोठा अनुभव त्यांच्या कडे आहे. आमच्या पुढील वाढीच्या टप्प्यात आम्हाला तो अत्यंत उपयुक्त ठरेल.”
गुंतवणुकीबद्दल आपले मत व्यक्त करताना A91 पार्टनर्समधील पार्टनर श्री. अभय पांडे म्हणाले:
“आम्हाला किरीट, विवेक आणि नितीन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यायोगे आम्ही होम एन्ड ऑफिस इम्प्रुमेन्ट क्षेत्रात एक प्रभावी आणि अग्रगण्य कंपनी उभारू इच्छित आहे.”
1996 मध्ये श्री. किरीट जोशी आणि श्री. विवेक देशपांडे यांनी स्थापन केलेल्या स्पेसवुडने भारताच्या संघटित फर्निचर क्षेत्रात सर्वात विश्वासार्ह नावांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 2011 मध्ये श्री. नितीन सुदामे यांनी स्पेसवुड ऑफिस सोल्यूशन्स (SOS) चे संस्थापक म्हणून कंपनीत प्रवेश केला आणि ऑफिस फर्निचर क्षेत्रात कंपनीचा विस्तार केला.
डिझाइन नाविन्यपूर्णता, टिकाऊपणा आणि उत्कृष्ट कारागिरीवर लक्ष केंद्रित करून स्पेसवुडने संपूर्ण घरात मॉड्युलर उपायसुविधा पुरवणारा विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.
आर्थिक वर्ष 26 (अंदाजे) साठी कंपनी सुमारे 700 कोटी रु. गट महसुलाचे उद्दिष्ट ठेवत आहे. A91 पार्टनर्सच्या पाठबळाने स्पेसवुड पुढील पाच वर्षांत 25–30% वार्षिक वाढ साध्य करण्याचे आणि नफा मिळविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. कंपनीच्या कामकाज आणि रिटेल स्थानात मजबुतीसाठी हा निधी तंत्रज्ञान अद्ययावत करणे, प्रक्रिया स्वयंचलित करणे आणि कौशल्य प्राप्त करणे यासाठी वापरला जाणार आहे.
स्पेसवुड भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक फर्निचर उत्पादन केंद्रांपैकी एक चालवते. हे सुविधा केंद्र 1 दशलक्ष चौरस फुट पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले आहे आणि अत्याधुनिक पॅनेल आणि शीट मेटल प्रोसेसिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कंपनीच्या विविध उत्पादन पोर्टफोलिओमध्ये मॉड्युलर किचन्स, वॉर्डरोब्स, होम फर्निचर, प्री-हंग डोअर्स आणि SOS ब्रँडखालील ऑफिस फर्निचर यांचा समावेश आहे.
सध्या, स्पेसवुडकडे 20 हून अधिक शहरांमध्ये 35 हून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आहेत. तसेच 150 शहरांमध्ये आणि गावांमध्ये 500 हून अधिक भागीदारांचे डीलर नेटवर्क आहे. पुढील काही वर्षांत कंपनी देशभरात 100 स्टोअर्स पर्यंत विस्तार करण्याची योजना आखत आहे आणि Amazon आणि Pepperfry सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे आपले ओम्नीचॅनेल स्थान मजबूत करणार आहे.
कंपनीचा उद्योग व्यवसाय भारतातील प्रमुख कॉर्पोरेट्स आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सना सेवा पुरवतो. स्पेसवुड ऑफिस सोल्यूशन्स विभागाने ॲक्सेंचर, केपजेमिनी, एचडीएफसी आणि अदानी ग्रुप सारख्या 1000 हून अधिक कॉर्पोरेट्ससाठी कार्यस्थळ सोल्युशन्स पुरवले आहेत. याशिवाय, कंपनी प्रमुख शैक्षणिक संस्थांसाठी फर्निचर पुरवते. “आम्ही पुढील काही वर्षांत टियर 2 शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखत आहोत,” असं नितीन सुदामे यांनी सांगितलं.
त्यांचा सुमाई डोअर्स विभाग भारतातील 200 हून अधिक डेव्हलपर्स सोबत कार्य करतो. त्यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, डीएलएफ, लोढा, एम3एम, कोलते पाटीलआणि इतर अग्रगण्य नावे समाविष्ट आहेत. त्यामुळे कंपनीची B2B क्षेत्रातील विश्वासार्हता अधिक मजबूत झाली आहे.
या गुंतवणुकीमुळे आधुनिक, कार्यक्षम आणि सौंदर्यपूर्ण जीवनशैली शोधणाऱ्या डिझाइन-कॉन्शस ग्राहकांना सेवा देत स्पेसवुड मास-प्रिमियम आणि प्रिमियम फर्निचर कॅटेगरीजमध्ये आपले नेतृत्व अधिक बळकट करणार आहे.

