सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा ; पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन
पुणे : रोहन बलकवडेच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर राजर्षि शाहू सहकारी बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत संत सोपानकाका सहकारी बँकेवर आठ गडी राखून सहज मात केली.
नेहरू स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. संत सोपानकाका सहकारी बँकेला प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ७ बाद ४९ धावाच करता आल्या. यात केवळ एकालाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. इतरांनी राजर्षि शाहू बँकेच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. राजर्षि शाहू बँकेकडून रोहन बलकवडेने तीन गडी बाद केले, तर वैभव पायगुडेने दोन गडी बाद करून त्याला उत्तम साथ दिली. राजर्षि शाहू बँकेने विजयी लक्ष्य ६.१ षटकांतच पूर्ण केले. यात वैभव पायगुडेने १७, तर प्रशांत सुपेकरने नाबाद १५ धावा केल्या.
धावफलक
१) संत सोपानकाका सहकारी बँक – ८ षटकांत ७ बाद ४९ (कैलास शिंदे १०, श्रीपाद जगताप नाबाद ९, योगेश वाघ नाबाद ९, रोहन बलकवडे ३-१६, वैभव पायगुडे २-९, दीपक वैराट १-१५) पराभूत वि. राजर्षि शाहू सहकारी बँक – ६.१ षटकांत २ बाद ५१ (वैभव पायगुडे १७, प्रशांत सुपेकर नाबाद १५, कैलास शिंदे १-१, रोहित कडू १-१४). सामनावीर – रोहन बलकवडे.
२) पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ५ बाद ४७ (हृषितोष सावळे १३, सुमीत गद्रे २०७, भूषण शहारे १-६, श्रेयस फाटक १-५) पराभूत वि. संपदा सहकारी बँक – ५.१ षटकांत २ बाद ४८ (श्रेयस फाटक नाबाद २६, मंदार गुर्जुर नाबाद ६, किरण चोरमारे १-२७, एम. ढमढेरे १-४). सामनावीर – श्रेयस फाटक.
३) सन्मित्र सहकारी बँक – ८ षटकांत ७ बाद ५९ (प्रवीण ताम्हाणे २२, नितीन लोहार १३, ऋषीकेश जगताप १०, मयुरेश जाधव २-३, हर्षद जळगावकर १-७) पराभूत वि. कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक – ३.४ षटकांत बिनबाद ६० (प्रसाद शिंदे नाबाद २८, प्रतीक पटवर्धन नाबाद २५). सामनावीर – मयुरेश जाधव.
४) जनता सहकारी बँक – ८ षटकांत ५ बाद ८१ (अथर्व जोशी ३१, उदय नाबाद १०, वेदान्त मराठे ८, अभिषेक कुलकर्णी २-२०, हिमांशू १-१५) वि. वि. महेश सहकारी बँक – ८ षटकांत ४ बाद ६२ (सागर सप्रे ११, विशाल के. नाबाद १५, चैतन्य २-१०, अश्विन शेलार १-२५, तुषार दिवटे १-१३). सामनावीर – अथर्व जोशी.

