दादा, दिलेला शब्द पाळतो..! ;गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन प्रश्न लावणार मार्गी…
मुंबई दि. ६ नोव्हेंबर – इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमवेत वरळी डोम येथे बैठक घेऊन आपल्या समस्या मांडल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे नेते अर्जुन टिळे यांच्यासमवेत आलेल्या इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या शिष्टमंडळातील कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे गार्हाणे अजितदादांसमोर मांडले. यावेळी अजितदादा पवार यांनी आपल्या समस्या मुद्देसूद माझ्याकडे द्या, त्या सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची लवकरच दिल्लीत भेट घेऊन तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवेन असा शब्द झालेल्या बैठकीत दिला.
यावेळी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, नाशिक येथील राष्ट्रवादीचे नेते अर्जुन टिळे, डॉ. जाकीर शेख, राजेश बेंस, इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धुंदरे, जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे उपस्थित होते.

