एसएईएल इंडस्ट्रीज लिमिटेड ही अक्षय उर्जा क्षेत्रामधील भारतातील पाच अग्रगण्य स्वतंत्र वीज उत्पादक कंपन्यांपैकी (आयपीपी) एक आहे. या कंपन्या ऊर्ध्वपातळीवर एकत्रित कार्यप्रणाली असलेल्या असून, दि. 30 जून 2025 पर्यंतची कार्यक्षम क्षमता लक्षात घेतल्यास त्या स्वतःच्या सोलार मॉड्यूल निर्मिती क्षमतेने सुसज्ज आहेत (संदर्भ : क्रिसिलचा अहवाल).
‘एसएईएल इंडस्ट्रीज कंपनी’ने सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) या संस्थेकडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. या आयपीओतून कंपनी प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सच्या इश्यूद्वारे एकूण 4,575 कोटी रुपयांची रक्कम (एकूण ऑफरचा आकार) उभारणार आहे
या प्रस्तावित इश्यूमध्ये 3,750 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर्स (फ्रेश इश्यू), तसेच भागधारकांकडील विक्रीसाठी ऑफर करण्यात आलेले (ऑफर फॉर सेल) 825 कोटी रुपयांचे शेअर्स यांचा समावेश आहे.
या ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’द्वारे ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) या स्टॉक एक्सचेंजेसवर सूचीबद्ध होण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे (लिस्टिंग तपशील).
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, आणि अँबिट प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

