पुणे : गाडीचा पाठलाग करुन त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक देवून बाजीराव रोडवर भरदुपारी एका अल्पवयीन मुलाचा खून करणारे तिघे अल्पयीन मुले पोलिसांनी पकडलेले आहेत.
या प्रकरणी एका (वय १६ वर्षे रा. सर्वे नं.१३३ इंडीयन ऑईल पेट्रोलपंपाजवळ, दांडेकर पुल, पुणे. असलेल्या) मुलाने फिर्याद दिली आहे
आणि तीन विधीसंर्घर्षित बालक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत
काल दि.०४/११/२०२५ रोजी दुपारी ३ वाजून १० मिनिटे झाली असतानाच्या सुमारास कृष्णकुंज बिल्डींग समोर, महाराणा प्रताप गार्डन जवळ, १३२७ शुक्रवार पेठ, पुणे येथे सार्वजनिक रोडवर हि हत्या करण्यात आली .यातील फिर्यादी व त्यांचा मित्र नमुद ठिकाणी मोपेड गाडीवरुन जात असताना, या ३ आरोपींनी जुने भांडणाच्या कारणावरुन त्यांचा गाडीचा पाठलाग करुन त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक देवून फिर्यादी यांचा मित्र नामे मयंक सोमदत्त खरारे, वय १७ वर्षे, रा.आंबिलवाडा कॉलनी, साने नगर, बिल्डींग नं.२ पुणे. (मयत) याला धारदार हत्याराने मारुन खुन केला.
दुचाकीवरुन जाणार्या दोघा युवकांवर मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने सपासप वार करुन त्यातील एका १७ वर्षाच्या युवकाचा निर्घुण खुन करण्यात आला. बाजीराव रोडवर मंगळवारी भर दुपारी झालेल्या या घटनेतील तिघा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मयंक सोमदत्त खरारे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचा मित्र (वय १६, रा. दांडेकर पुल) यालाही कोयता लागून जखम झाली आहे. त्याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयंक खरारे हा मुळचा मंगळवार पेठेत राहणारा आहे. त्याची आई महापालिकेत कामाला आहे. त्यामुळे त्यांना साने गुरुजीनगर येथे खोली मिळाली आहे. तेथे ते राहतात. जुलै महिन्यांत जनता वसाहतीतील मुलांबरोबर त्याची भांडणे झाली होती. त्यात मयंक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मयंक याचा खुन करणारा मुख्य अल्पवयीन मुलगा त्यावेळी फिर्यादी होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि मयंक खरारे हे दोघे मोपेडवरुन मंडईकडे मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांचे ओळखीचे तिघे जण मोटारसायकलवरुन पाठलाग करत आले. महाराणा प्रताप गार्डन जवळील कृष्णकुंज बिल्डिंगसमोर त्यांनी इंगळे याच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. मयंक खरारे याच्या तोंडावर, मानेवर व डोक्यावर कोयत्याने ठिकठिकाणी सपासप वार केले. मयंक याला वाचविण्याचा प्रयत्न करताना इंगळे याच्यावर ही त्यांनी वार करुन जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंक याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

