सहकार करंडक क्रिकेट स्पर्धा ; पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने आयोजन
पुणे : राजगुरुनगर सहकारी बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतरसहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेवर १७ धावांनी मात केली.
सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. राजगुरूनगर बँकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ८ षटकांत ३ बाद ९७ धावा केल्या. यात अनिकेत काहाने याने सर्वाधिक ३५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना प्रेरणा बँकेकडून तुकाराम शेळकेने अर्धशतक ठोकले. मात्र, त्याला इतरांची अपेक्षित साथ लाभली नाही. प्रेरणा बँकेला निर्धारित ८ षटकांत ४ बाद ८० धावाच करता आल्या. तुकारामचे अर्धशतक व्यर्थ ठरले.
धावफलक
१) राजगुरूनगर सहकारी बँक – ८ षटकांत ३ बाद ९७ (अनिकेत कहाणे ३५, सागर नाईकनवरे १९, तुषार अरुडे १०, प्रवीण बेंडाळे २-२०, वैभव दसरे १-३४) वि. वि. प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ४ बाद ८० (तुकाराम शेळके ५०, अभि होनराव २-१७, दीपक तनपुरे २-२०). सामनावीर – अनिकेत कहाणे.
२) विश्वेश्वर सहकारी बँक – ८ षटकांत २ बाद ७६ (मंदार धुमके ३२, श्रीकांत मारटकर २९, मंदार शेंडे १-१३, जय गवळी १-२१) वि. वि. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत ४ बाद ६४ (उमेश नाबाद ३४, किशोर तुपे १३, श्रीकांत मारटकर १-६, राजेश कोलते १-१८). सामनावीर – श्रीकांत मारटकर.
३) संपदा सहकारी बँक – ८ षटकांत ६ बाद ७४ (श्रेयस पाठक नाबाद ३४, भूषण शहारे १०, ऋषी पाटील २-९, श्रीकांत मारटकर १-१४, अतुल धुमाळ १-१२) वि. वि. विश्वेश्वर सहकारी बँक – ८ षटकांत ४ बाद ६७ (मंदार धुमके नाबाद ३८, श्रीकांत मारटकर १६, भूषण शहारे १-१८, श्रेयस पाठक १-७). सामनावीर – श्रेयस पाठक
४) धर्मवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक – ८ षटकांत २ बाद ७३ (सचिन कडू नाबाद ३९, स्वप्नील शितोळे १४, सागर निरगुण १-२०) पराभूत वि. राजर्षि शाहू सहकारी बँक – ७.३ षटकांत ४ बाद ७४ (राहुल देशमाने १९, अजिंक्य खोपडे १७, रोहन बलकवडे १६, स्वप्नील शितोळे २-२६, सचिन कडू १-११). सामनावीर – रोहन बलकवडे.

