पुणे- पुण्याचे प्रसिद्ध अशा तळजाई मंदिराच्या परिसरात मॉर्निंग किंवा सायंकालीन वॉक करायला जाताना दागिने घालून जाऊ नका असे आता सांगावे लागेल अशी स्थिती दिसते आहे . येथे सीसी टीव्ही कॅमेरे महापालिकेने बसवले होते पण ते सध्या आहेत कि नाहीत ? याचीही माहिती कोणाकडे नाही.सदू शिंदे मैदान, तळजाई माता मंदिर आणि तळजाई जंगल एकूणच व्यायामासाठी उत्कृष्ट पर्यावरणीय परिसर असल्याने येथे असंख्य लोक येत असतात . पण प्रचंड वेगाने वाहने पळविणाऱ्या टोळ्या आता येथे पुन्हा दिसू लागल्या आहेत . काल पहाटे सव्वा पाच वाजता सॅलेसबरी पार्क, गुलटेकडी येथून तळजाई ला वॉकिंग साठी आलेल्या ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील चेन बाईक स्वारांनी जबरदस्तीने हिसकावून नेली . पोलीस उप-निरीक्षक, एस. डी. फकीर, मो.नं. ८६६८७०००८९ हे या प्रकरणी तपास करत आहेत.
दुसर्या एका घटनेत काल आंबेगाव परिसरात एका २६ वर्षीय तरुणावर तिघा मुलांनी खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यापैकी
मृणाल दिपक जाधव, वय १९ वर्षे, रा. राज टॉवर फ्लॅट नं २ एफ विंग भाजी मंडई कात्रज पुणे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील सी सी डीकॅफे समोर संबधित तरुण त्यांचा भाऊ आणि मित्रांसमवेत गप्पा मारत थांबलेले असताना या तिघांची गाडी त्यांच्या गाडीला धडकली असता तेव्हा ती पाहण्यासाठी गेले असताना यांना या तिघांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली व लोखंडी हत्याराने वार करून जखमी केऋण लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी हत्याराने व डोक्यात बाटली मारुन जखमी केले. आणि त्यांच्याकडील लोखंडी हत्यार हवेत फिरवत परिसरात दहशत पसरवून पळून गेले.सहा. पोलीस निरीक्षक फिरोज मुलानी, मो.नं. ९८२२४३४५०० याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
तळजाई माता मंदिरासमोर मॉंर्निंग वॉक करणाऱ्याची ४ लाखाची लुट,आंबेगावात अल्पवयीन मुलांनी केला खुनी हल्ला
Date:

