पुणे-भाजपचे पुण्यातील खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पुणे महानगर प्रमुख पदावर असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक गंभीर पोस्ट सोशल मिडियावर FB आणि X वर अपलोड केली आहे. ज्यात असे म्हटले आहे कि,
‘पौडफाटा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहळांच्या गुंडाचा हल्ला..मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्यांक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत तीस ते चाळीस साथीदारांसह मेगा सिटी वस्तीमध्ये घुसून समीर चव्हाण, सनी चव्हाण यांसह वस्तीतील महिलांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.मी पुन्हा एकदा सांगतो,सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो बाकी गुन्हेगारीची पाळेमुळे इथेच आहेत.
या पोस्ट वर त्यंनी काही फोटो टाकलेले आहेत . तर X वरील पोस्ट मध्ये एक व्हिडीओ देखील टाकला आहे .
https://twitter.com/DhangekarRavii/status/1985757048144085265
काल रात्री ही पोस्ट करण्यात आली मात्र त्यावर भाजपा अथवा मंत्री मोहोळ यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया आलेली नाही .

याशिवाय धंगेकर यांनी असे म्हटले आहे कि,’ कोथरूडमध्ये समाजकंटकांकडून भ्याड हल्ल्यात जखमी झालेल्या समीर चव्हाण व सनी चव्हाण यांची आपण रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तब्येतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांकडून उपचाराबाबतची माहिती जाणून घेतली आहे.


