पुणे- जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेली आंदोलने आणि जन्क्शोब पाहता वनविभागाच्या रेस्क्यू टीम ने संबधित बिबट्या जेरबंद करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीत त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला गेला पण तो हुकला आणि बिबट्या चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजता च्या सुमारास गोळी झाडल्याने हा नर बिबट्या ठार झाला
मौजे पिंपरखेड व परिसरामध्ये मागील वीस दिवसांमध्ये दिनांक 12/10/2025 रोजी शिवन्या शैलेश बोंबे, वय 5 वर्ष 6 महिने, दिनांक 22/10/2025 रोजी भागुबाई रंगनाथ जाधव, वय 82 वर्षे आणि रोहन विलास बोंबे वय 13 वर्षे यांचे दुर्दैवी मृत्यू वन्य प्राणी बिबट च्या हल्ल्यामध्ये झाल्याने मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून जुन्नर,शिरूर, आंबेगाव व खेड तालुक्यामधील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 12/10/2025 व दिनांक 22/10/2025 रोजी पंचतळे येथे बेल्हे जेजुरी राज्यमार्ग रोखून तसेच दिनांक 3/ 11/2025 रोजी मौजे मंचर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून वरील चारही तालुक्यातील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले होते तसेच दिनांक 2/11/2025 रोजी बिबट हल्ल्यात रोहन विलास बोंबे या 13 वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाणे वनविभागाच्या गस्ती वाहन तसेच येथील स्थानिक बेस कॅम्प इमारत पेटवून देऊन मोठ्या प्रमाणात जाळपोळ केला.
दिनांक 3/11/2025 रोजी संतप्त नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग सुमारे 18 तास रोखून धरला होता नरभक्षक झालेल्या पिंपरखेड परिसरातील वन्यप्राणी बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली होती सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणे चे डॉ. सात्विक पाठक पशु चिकीत्सक, जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दिवसभरात परिसरात ठीक ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोन च्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरामध्ये त्या नरभक्षक बिबट्याचा शोध घेतला असता घटनास्थळापासून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला असता सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना बंदूकधारी शार्प शूटर यांनी त्यावर रात्री 10.30 वाजता च्या सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबट मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे शव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले त्यानंतर सदर शव शवविच्छेदना करिता माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले
सदर कार्यवाही श्री आशिष ठाकरे वनसंरक्षक वनवृत्त पुणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खाडे उपवनसंरक्षक जुन्नर श्रीमती स्मिता राजहंस व श्री अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर श्री निळकंठ गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर व रेस्क्यू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी केले

