श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अन्नकोट करण्यात आला. फिरता अन्नकोट हे यंदाचे प्रमुख वैशिष्टय होते. नमकीन पदार्थ, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे आणि विविध प्रकारची मिठाई अशा १२५ मिष्टान्नांचा फिरता अन्नकोट करण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. अन्नकोट मांडण्यासाठी व्यवस्थापक अशोक दोरुगडे, सेवेकरी नंदू चिप्पा आणि वैभव निलाखे यांनी सहकार्य केले
अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजविण्यात आले. दत्तमंदिरातील यंदा प्रथमच साकारलेला फिरता अन्नकोट पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली होती. ट्रस्टचे कोषाध्यक्ष युवराज गाडवे यांच्या वतीने काका हलवाई तर्फे अन्नकोटाला विशेष सहकार्य करण्यात आले. अन्नकोटासाठी मांडण्यात आलेले पदार्थ सामाजिक संस्थांना देण्यात येणार असून उर्वरित पदार्थ मंदिरामध्ये भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ दत्तमंदिरात १२५ मिष्टान्नांचा फिरता अन्नकोट
Date:

