पुणे-विमान नगर येथील फिनिक्स मॉल लगत प्री फॅब्रिकेटेड स्मार्ट पब्लिक टॉयलेटचे उद्घाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर ,(ज) यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आमदार बापू पठारे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त संदीप कदम, कार्यकारी अभियंता अमर मदिकुंठ ,प्रसाद जगताप ,उपअभियंता नाईकनवरे ,कनिष्ठ अभियंता चोपडे व नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाकडील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
सदर शौचालय हे ४४४ चौरस फूट आकारमानाचे एअर कंडिशनन्ड स्मार्ट टॉयलेट असून यातील ७० टक्के भाग शौचालयाकरिता व ३० टक्के भाग कॅफे करिता ठेवण्यात आलेला आहे. पुरुषांकरिता पाच टॉयलेट्स व मुतारी, महिलांकरिता पाच टॉयलेट्स व बेबी फीडिंग रूम /चेंजिंग रूम , तृतीयपंथीय व्यक्तिंकरिता स्वतंत्र शौचालय व अपंग व्यक्तींकरिता स्वतंत्र शौचालयाची निर्मिती केलेली आहे. सदर प्रकल्पाचे उभारणी करिता आत्ता पर्यंत सुमारे ३३ लक्ष रुपये इतका खर्च करण्यात आलेला आहे.
परोसा प्रायव्हेट लिमिटेड , ठेकेदार हे यापुढे दहा वर्षांकरिता कॅफे चालवून निर्माण होणाऱ्या उत्पन्नावर शौचालयाची देखभाल दुरुस्ती व दैनंदिन स्वच्छता करणार आहेत.

