पुणे पोलिसांनी घेतले ताब्यात!
पुणे : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून एक जण पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचला. वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटल्यानंतर माझा मित्रही आयपीएस असल्याचे त्याने सांगितलं. मित्राबाबत अधिक माहिती विचारताच जे नाव घेतलं तोच समोर आल्यानं बनावट आयपीएस अधिकाऱ्याचं पितळं उघडं पडलं. आता या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सागर वाघमोडे असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे. वाघमोडे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातला आहे. वाघमोडे हा आपण आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत फिरत होता. तो पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला.
त्यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली. तेव्हा चौकशीत त्याचं पितळ उघडं पडलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता चौकशी सुरू आहे. पोलीस आयुक्तालयात तो का गेला? कुणाला भेटला? त्याचा काय उद्देश होता? यामागचा तपास केला जात आहे.

