महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राधिका क्रिएशन्स यांच्यावतीने आयोजन

हडपसर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन सरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्या जीवनावर आधारित ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाचा ५२ वा प्रयोग हडपसर येथील खासदार विठ्ठलराव तुपे पाटील सभागृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. प्रेरणादायी कथानक, कलाकारांचे प्रभावी अभिनय आणि दिग्दर्शकीय सादरीकरण यामुळे हा प्रयोग प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राधिका क्रिएशन्स पुणे–नागपूर निर्मित या नाटकाच्या आयोजनात छाया संजीव गदादे यांचे विशेष सहकार्य लाभले. या नाटकाचे मार्गदर्शक सुनिल भुसारी असून, लेखन श्रीधर गडगे यांनी केले आहे. दिग्दर्शन संजय पेंडसे यांचे असून, निर्मिती सारिका पेंडसे यांनी केली आहे. दोन अंकी या नाटकात तब्बल ३५ कलाकारांनी प्रथम तीन सरसंघचालकांचे जीवन, संघर्ष आणि कार्य यांचे प्रभावी सादरीकरण केले.
या प्रसंगी जेष्ठ गोरक्षक मिलिंद एकबोटे, मिलिंद वायकर, महेश रनवरे, राजाभाऊ शेवाळे, जगन्नाथ लडकत, मारुतीआबा तुपे, संदीप दळवी, प्रवीणनाना काळभोर, राहुल शेवाळे, संदीप लोणकर, प्रतिमा शेवाळे, प्रमोद सातव, स्मिता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
छाया संजीव गदादे म्हणाल्या, जो इतिहास सांगितला जातो, जो इतिहास शिकवला जातो, तोच पुढील पिढ्या लक्षात ठेवतात. प्रथम तीन सरसंघचालकांचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकाच्या माध्यमातून होत आहे.

