· IFRS अंतर्गत आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये COR मध्ये 170 bps ने सुधारणा
• ताज्या रिटेल प्रीमियममध्ये 24% वाढ
• खर्चाच्या गुणोत्तरात (Expense Ratio) 31.1% वरून 29.7% वर सुधारणा (IFRS)
चेन्नई,: भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र रिटेल आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) ने 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या सहामाहीसाठी (H1FY26 आर्थिक वर्ष 26 ची पहिली सहामाही) आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने 518 कोटी रु. चा करपश्चात नफा (PAT) नोंदवला असून IFRS अंतर्गत 21% वार्षिक वाढ आहे. ही वाढ नुकसान गुणोत्तराचे (Loss Ratio) चांगले प्रमाण आणि सुधारित कार्यक्षमतेमुळे झाली आहे.
कंपनीने दुसऱ्या तिमाही मध्येही आपली मजबूत गती कायम ठेवली असून आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 12% वार्षिक वाढ दर्शवत ग्रॉस रिटन प्रीमियम (GWP) 8,809 कोटी रु. वर (N आधारावर) पोहोचला आहे. रिटेल GWP 17% ने वाढून 8,332 कोटी रु. वर (N आधारावर) पोहोचला आहे. त्याला फ्रेश रिटेल प्रीमियममध्ये 24% वाढ आणि रिटेल हेल्थमध्ये 98% नूतनीकरण टिकाऊपणा (renewal persistency) यामुळे चालना मिळाली आहे. 32% बाजारपेठीय हिस्स्यासह कंपनी भारतातील रिटेल हेल्थ विमा क्षेत्रात अग्रणी राहिली आहे.
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आम्ही स्थिर आणि अर्थपूर्ण प्रगती केली असून IFRS प्रमाणे PAT मध्ये 21% वाढ झाली आहे. 8.3% या भक्कम गुंतवणूक परताव्याबरोबरच सुधारित लॉस रेशो आणि खर्चातील घट यामुळे नफ्यात वाढ साध्य झाली आहे.”
ग्राहकांचा अनुभव हा स्टार हेल्थच्या धोरणाचा पाया राहिला आहे. आमच्या दाव्यांवरील NPS 52 वरून 61 वर सुधारला असून, कंपनीचा एकूण NPS 59 वरून 61 वर वाढला आहे. हे निकाल आमच्या सातत्यपूर्ण कार्यप्रदर्शनाचे आणि रिटेल-केंद्रित मॉडेलच्या मजबूतीचे द्योतक आहेत.
“रिटेल हेल्थ इन्शुरन्सवर GST सूट मिळाल्याने आम्ही जोरदार सकारात्मक प्रवाह पाहत आहोत. सुरुवातीच्या प्रवाहावरून मागणीत वाढ स्पष्ट दिसत असून त्याचे प्रतिबिंब मजबूत लीड जनरेशन, नवीन पॉलिसी जारी करणे आणि ऑक्टोबरमधील GWP वाढीत दिसून येते. हे वाढत्या परवडणाऱ्या आरोग्य विम्याचे सूचक आहे.”
कंपनीचे पोर्टफोलिओ पुनर्संतुलनाचे (portfolio recalibration) परिणाम दिसून येत आहेत. नेट इन्कर्ड क्लेम्स रेशो आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 70.6% वर राहिला. तो गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 30 bps ने कमी आहे. मजबूत रिटेल मिश्रण आणि अधिक नफा देणाऱ्या समूह विभागामुळे हे शक्य झाले आहे. कंपनीचे प्रमुख उत्पादन सुपर स्टार ने आपल्या पहिल्याच वर्षात 1,250 कोटी रु. च्या प्रीमियमचा टप्पा ओलांडला असून हे ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद आणि उत्पादनाच्या ताकदीचे प्रतीक आहे. कंपनी आता जसे पूर्वी जाहीर केले होते तसे वार्षिक रीप्राइसिंग धोरण अवलंबेल.
खर्चाचे गुणोत्तर (Expense Ratio) आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या सहामाही मध्ये 29.7% वर सुधारला आहे (गेल्या वर्षी ते 31.1% होते). मनुष्यबळ उत्पादकता, प्रक्रिया कार्यक्षमता आणि शिस्तबद्ध खर्च व्यवस्थापनामुळे हे शक्य झाले आहे. कंबाइंड रेशो (IFRS आधारावर) गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 102.1% वरून 100.3% पर्यंत सुधारला आहे, तर सॉल्व्हेन्सी रेशो नियामक आवश्यकतेपेक्षा खूपच जास्त 2.15x वर मजबूत राहिला आहे.
आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये खर्चाचे गुणोत्तर आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मधील 31.1% वरून 29.3% वर सुधारले आहे. लॉस रेशो आर्थिक वर्ष 25 च्या दुसऱ्या तिमाही मधील 73.7% वरून आर्थिक वर्ष 26 च्या दुसऱ्या तिमाही मध्ये 71.8% झाला आहे. कंबाइंड रेशो (IFRS आधारावर) मागील वर्षीच्या याच कालावधीतील104.8% वरून या वर्षी 101% झाला आहे.
कंपनीने आपल्या तंत्रज्ञान-आधारित ग्राहक अनुभव उपक्रमांना पुढे नेले असून, जलद आणि अखंड क्लेम सेटलमेंटसाठी AI-प्रणीत क्लेम प्लॅटफॉर्म लागू केला आहे. स्टार हेल्थ अॅपने आता 12 दशलक्ष डाउनलोड्सचा टप्पा पार केला आहे.
स्टार हेल्थ शिस्तबद्ध अंडररायटिंग, प्रगत डिजिटल आणि फसवणूक विश्लेषण (fraud analytics), तसेच रुग्णालये आणि वितरकांसोबत सखोल भागीदारी यावर लक्ष केंद्रित करत आहे. कंपनी जबाबदार वाढ आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पनांचा संगम साधत भारताच्या 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा या राष्ट्रीय दृष्टीकोनाशी सुसंगतपणे आपले नेतृत्व कायम राखण्याच्या स्थितीत आहे.

