Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मंत्रा मॅग्नस मुंढवा जंक्शन येथे करत आहे आरामशीरपणाची पुर्नव्याख्या

Date:

~ 2BHK ची ५०% पेक्षा जास्त नोंदणी आणि 2BHK निवासस्थानांची पूर्ण विक्री~

~ २ दिवसांच्या कार्यक्रमात अभूतपूर्व मागणी दिसून आली आणि बहुसंख्य युनिट्सची संभाव्य घरमालकांना विक्री करण्यात आली ~


~2bhk, 3bhk आणि 3bhk डुप्लेक्स यांचा समावेश असलेली २०० हून अधिक युनिट्स सादर~

पुणे-१९जानेवारी २०२४: प्रीमियम रिअल इस्टेटमध्ये आघाडीवर असलेल्या मंत्राला मुंढवा जंक्शनच्या महत्वपूर्ण स्थळी असलेल्या मंत्रा मॅग्नस या त्यांच्या नवीनतम लक्झरी योजनेच्या जबरदस्त यशाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या वाटप कार्यक्रमाने, मंत्रा मॅग्नसने आधुनिक शहरी राहणीमानात एक नवीन मापदंड स्थापित केला आहे.

मंत्रा मॅग्नसने निवासस्थानाची पुनर्कल्पना केली आहे आणि पुण्यातील भारदस्त आणि महत्त्वाकांक्षी व्यावसायिकांसाठी एक आरामदायी जीवनशैलीसाठीचे साधन तयार केले आहे. जीवनातील निरंतर विकासाचे प्रतीक अशा “जीवन वृद्धी भव” या संकल्पनेने प्रेरित असा हा प्रकल्प आरामशीरपणा आणि कार्यक्षमता यांची सुंदर जोडणी करतो. वास्तुशास्त्रीय रचनेमध्ये अत्याधुनिक सुविधा, विस्तीर्ण हिरवीगार जागा आणि शहरी जीवनाची नस बरोबर पकडणारे डिझाईन आहे.

२ दिवसीय वाटप कार्यक्रमाला १६० हून अधिक ग्राहक आणि असंख्य वॉक-इनसह विलक्षण प्रतिसाद मिळाला. सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 2 BHK अपार्टमेंट्सची संपूर्ण विक्री झाली. त्यांची सुरुवात ८६.९९ लाख रुपयांपासून होती. त्याआधी त्यांची ५०% हून अधिक नोंदणी झाली होती. कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी बहुतांश 3 BHK युनिट्सची (किंमत १.१५ कोटी रु.पासून) आणि डुप्लेक्स युनिट्सची (१.३८ कोटी रु.पासून सुरू होणारी) विक्री झाली. या प्रकल्पात १५० कोटी रु. हून अधिक विक्री झाली.

विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेले मंत्रा मॅग्नस २०० पेक्षा जास्त लक्झरी युनिट्स सादर करते. विशेषत: आयटी, बँकिंग आणि वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण आणि कृतीशील व्यावसायिकांच्या जीवनशैलीच्या गरजा पुरविण्याच्या दृष्टीने या युनिट्सची रचना करण्यात आली आहे. प्रामुख्याने मुले असलेली तरुण विवाहित जोडपी 3 BHK आणि डुप्लेक्स युनिट्स यांना अधिक पसंती देताना दिसून आले. सुधारित जीवनशैलीसाठी त्यांच्या आकांक्षांशी उत्तम प्रकारे सुसंगत अशी ही युनिट्स आहेत.

मंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रोहित गुप्ता म्हणाले, “मंत्रा मॅग्नसने आरामशीर जीवनशैलीसाठी अभूतपूर्व मागणी अनुभवली आहे. आमच्या रहिवाशांना विलक्षण आरामशीर अनुभव मिळेल हे सुनिश्चित करत आम्ही प्रत्येक पैलू ‘जीवन वृद्धी भव’ या संकल्पनेसह तयार केला आहे. या वाटप कार्यक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून पुण्यातील चोखंदळ व्यावसायिक आणि संभाव्य गृहखरेदी करणार्‍यांमध्ये मंत्रा मॅग्नसने विश्वास आणि आकांक्षा चेतवली असल्याचे दिसून येते.”

मंत्रा मॅग्नसने आपल्या किमतीच्या धोरणासह लक्झरीमध्ये एक नवीन मापदंड प्रस्थापित केला आहे. आता पूर्णपणे विक्री झालेले २ बीएचके युनिट्स ८६.९९ लाख रुपयांपासून उपलब्ध होते. 3 बीएचके आणि डुप्लेक्स युनिट्स अनुक्रमे १.१५ कोटी रु. आणि १.३८ कोटी रु. पासून, उपलब्ध असून त्यापैकी अनेक युनिट्सची आधीच विक्री झालेली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय...

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या...