भटकी कुत्री चावली तर महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांवर गुन्हा दाखल होऊ शकेल..
पुणे:शिवाजीनगर गावठाण परिसरातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ एका तरुणाला ‘पीटबुल’ जातीच्या श्वानाने चावा घेतला. श्वानाने तरुणाच्या पोटरीचा चावा घेतल्याने त्याला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, श्वान मालकाने आक्रमक स्वभावाच्या ‘पीटबुल’ श्वानाला साखळी न बांधता रस्त्यावर मोकळे सोडले होते. पोलीस उपनिरीक्षक जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दुसरी घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली. किरकोळ वादातून एका श्वान मालकाने त्याचे पाळीव श्वान एका तरुणाच्या अंगावर सोडले. या श्वानाने चावा घेतल्याने तरुण जखमी झाला. याबाबत तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या पाळीव श्वानासह थांबला असताना त्याने तक्रारदार तरुणाच्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. तक्रारदार खाली उतरून विचारणा करत असताना आरोपीने श्वान त्यांच्या अंगावर सोडले. पोलीस उपनिरीक्षक एन. शेख या घटनेचा तपास करत आहेत.

