पुणे- पुण्यात बड्या बड्या बिल्डरांकडून जैन समाजाच्या धर्मादाय संस्थेची जी जागा विकत येत नाही , विकत कोणाला घेता येत नाही , आणि ज्या जागेचा व्यावहारिक विक्रीसाठीचे खरेदी खत देखील होऊ शकत नाही अशा मोडेल कॉलनीतील साडेतीन एकराच्या भूखंडाचा बेकायदेशीर व्यवहार झाला आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या , कधीकाळी कलमाडींच्या नेतृत्वाची जागा घ्यायला निघालेल्या सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी कळवूनही सरार्स याकडे दुर्लक्ष केल्याने जैन समाज याबाबत असमंजस भावनेत आहे . या पार्श्वभूमीवर आज जैन समाजाचे आचार्य गुप्ती नांदी महाराज यांनी देखील पत्रकार परिषदेतून नाराजीही व्यक्त केली आहे.
काय म्हणाले जैन मुनी:आमची लढाई कोणत्याही पक्षाशी नव्हे, तर भ्रष्टाचाराशी आहे, असे स्पष्ट करत जैन मुनींनी ट्रस्टींना सुनावले.जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द झाला. हा समाजाचा मोठा विजय आहे, असे सांगून जैन मुनींनी पुढची दिशा काय असणार आहे, याविषयी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मैत्री काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असेही जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले. या सर्व प्रकारास ट्रस्टचे काही पदाधिकारी जबाबदार असून, त्यांच्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे.तसेच, हा व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यत येत्या १ तारखेपासून होणारे उपोषण सुरुच राहणार असल्याचे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत. याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. १७ ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चापूर्वीच आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना आमचं म्हणणे पाठवले होते. मात्र त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहचून देखील ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी शब्द देखील काढलेला नाही. ते समाजासोबत उभे राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान अजित पवार यांच्या पक्षात असंख्य बिल्डर असून त्यांच्याबाबत देखील जनतेच्या असंख्य तक्रारी असतात . आणि हेच बिल्डर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या जनसंपर्क अभियानाची सूत्रे आपल्या हातही ठेऊन असतात या बाबींचा मोठा फटका अजित पवार यांच्या पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीत बसेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. रवींद्र धंगेकर यांच्या मुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता या राजकीय स्पर्धेत पुढे येऊ पाहते आहे तर भाजपने महापालिकेच्या कारभारात तेच तेच नेते रिपीट करून आणि मुंबई दिल्लीच्या राजकारणात देखील त्याच चेहऱ्यांना संधी दिली त्यांच्या भेदभावी कारभारावर भाजपच्या १०० नगरसेवकांच्या गोटातील मोठी संख्या नाराज आहे त्याचाही फटका भाजपला बसू शकणार आहे.
अशा स्थितीत आता जैन समाजाच्या जागेबाबत , मंदिर आणि बोर्डिंग बाबत चुप्पी साधून अजित पवार गटानेही नाराजी ओढवून घेतली आहे. कॉंग्रेसचे अरविंद शिंदे , शिवसेनेचे संजय मोरे हे या विषयामुळे जैन समाजाच्या संपर्कात राहिल्याचे दिसून आले आहे.

