· लेन्सकार्ट सोल्युशन्सलिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 382 रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 402 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025आहे.
· बोली/ऑफर शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025रोजी खुली होईल आणि मंगळवार, 04 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.
· बोली किमान 37 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 37 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक:
https://static.lenskart.com/media/desktop/corporate/LenskartSolutionsLimited-RHP_signed.pdf
पुणे , 27 ऑक्टोबर 2025: लेन्सकार्ट सोल्युशन्सलिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्रीखुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025आहे. बोली/ऑफर मंगळवार, 04 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.
प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 382 रुपये ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 402 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 37 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 37 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. कर्मचारी राखीव भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 19 रु. इतकी सवलत देण्यात येत आहे.
ऑफर मध्ये 21,500 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल मध्ये 127,562,573 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. यामध्ये पेयुष बन्सल, नेहा बन्सल, अमित चौधरी आणि सुमित कपाही (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) हे काही विद्यमान समभागधारक आणि SVF II लाईटबल्ब (Cayman) लिमिटेड, श्रोडर्स कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी एशिया मॉरीशस लिमिटेड, PI ऑपॉरच्युनिटीज फंड- II, MacRitchie इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड, केदारा कॅपिटल फंड II LLP आणि अल्फा वेव्ह व्हेंचर्स LP (“गुंतवणुकदार विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे. या ऑफरमध्ये 150 दशलक्ष रु. पर्यत कर्मचारी राखीव भागाचा समावेश असून उर्वरित ऑफरला पुढे “नेट ऑफर” म्हणले जाईल.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBsसाठी प्रमाणात वाटप केले जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. (“Non-Institutional Investors” or “NIIs”) (the “Non-Institutional Portion”) त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना वाटप केला जाऊ शकतो सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Bidders (RIBs) साठी निव्वळ ऑफरच्या (“Net Offer”) 10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.
येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंज”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टँनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अव्हेन्डस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि इंटेसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

