· ₹5 दर्शनी मूल्यावर (“इक्विटी शेअर”) प्रति इक्विटी शेअर ₹ 557 ते ₹ 585 असा प्राइस बँड निश्चित केला आहे.
· बोली/ऑफर गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी उघडेल आणि सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर बिडिंग बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 रोजी होईल.
· किमान 25 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 25 च्या पटीत बोली लावता येईल.
मुंबई, 27 ऑक्टोबर 2025: स्टड्स ऍक्सेसरीज लिमिटेड (“स्टड्स” किंवा “द कंपनी”), गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या (“ऑफर”) संदर्भात बोली/ऑफर कालावधीचा प्रस्ताव ठेवते आहे.
टोटल ऑफर साइझमध्ये कंपनीच्या काही विद्यमान शेअरहोल्डर्सद्वारे (“विक्री करणारे शेअरहोल्डर्स”) 7,786,120 पर्यंत इक्विटी शेअर्स (“विक्रीसाठी ऑफर”) विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (“टोटल ऑफर साइझ”).
विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये मधु भूषण खुराणा यांचे 3,800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, सिद्धार्थ भूषण खुराणा यांचे 800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, चांद खुराणा यांचे 2,100,000 पर्यंत इक्विटी शेअर्स (“एकत्रितरित्या प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) आणि संजय लीखा यांचे 342,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, संजय लीखा यांचे चारू लीखा यांच्यासोबत संयुक्तपणे 258,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, चारू लीखा यांचे 249,600 पर्यंत इक्विटी शेअर्स, निशा लीखा यांचे 100,800 पर्यंत इक्विटी शेअर्स, नैन तारा मेहता यांचे 57,600 पर्यंत इक्विटी शेअर्स, सुनील कुमार रस्तोगी यांचे 36,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, एसई शूज प्रायव्हेट लिमिटेड यांचे 25,920 पर्यंत इक्विटी शेअर्स, अजय कुमार सखुजा यांचे 16,200 पर्यंत इक्विटी शेअर्स (“इतर सेलिंग शेअरहोल्डर्स”) यांचा एकत्रितपणे (“विक्री करणारे भागधारक”) समावेश आहे.
अँकर इन्व्हेस्टर बिड/ऑफर कालावधी बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू होईल आणि त्याच दिवशी बंद होईल. बिड/ऑफर कालावधी गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.
ऑफरचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ₹ 557 ते ₹ 585 असा निश्चित करण्यात आला आहे. किमान 25 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 25 च्या पटीत बोली लावता येईल.
इक्विटी शेअर्स कंपनीच्या 25 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) द्वारे ऑफर केले जात आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरियाणा (“RoC”) तर्फे तो नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आला आहे.
25 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी, बीएसई लिमिटेड हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे.
आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (आधीचे IIFL सिक्युरिटीज लिमिटेड) आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या/जाणाऱ्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड संज्ञांचा अर्थ RHP मध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणेच असेल.
सेबी आयसीडीआर नियमांमधील नियम 31 सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रूल्स, 1957 च्या सुधारित (“एससीआरआर“) नियम 19(2)(ब) च्या अंतर्गत ही ऑफर दिली जात आहे. सेबी आयसीडीआर नियमांच्या नियम 6(1) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे ही ऑफर दिली जात आहे, ज्यामध्ये ऑफरचा 50% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी श्रेणी”) प्रमाणबद्ध आधारावर वाटपासाठी उपलब्ध नसेल. आमची कंपनी बीआरएलएमशी सल्लामसलत करून, पण मुखत्यारीने (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) अँकर इन्व्हेस्टर्सना क्यूआयबी श्रेणीच्या 60% पर्यंत वाटप करू शकते, ज्यापैकी एक तृतीयांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल. यात देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर इन्व्हेस्टर्सना इक्विटी शेअर्स वाटप केलेल्या किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त होण्यासाठी पात्र असेल. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सबस्क्रिप्शन कमी झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स QIB श्रेणीमध्ये (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) (“नेट QIB श्रेणी“) जोडले जातील.
याशिवाय, नेट क्यूआयबी श्रेणीतील 5% रक्कम केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. आणि जर ऑफर किंमतीवर किंवा त्यापेक्षा किमतीवर वैध बोली जास्त मिळाल्या असतील तर उर्वरित नेट क्यूआयबी श्रेणीतील रक्कम ही म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना प्रमाणानुसार वाटली जाईल.
सेबी आयसीडीआर नियमांनुसार, ऑफरचा किमान 15% हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“गैर-संस्थात्मक श्रेणी“) वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी एक तृतीयांश हिस्सा गैर-संस्थात्मक श्रेणी ₹200,000 पेक्षा जास्त आणि ₹1,000,000 पर्यंतची बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. तर गैर-संस्थात्मक श्रेणीचा दोन तृतीयांश हिस्सा ₹1,000,000 पेक्षा जास्त बोली लावणाऱ्या बोलीदारांसाठी उपलब्ध असेल. गैर-संस्थात्मक श्रेणीच्या या दोन्ही उपश्रेणींपैकी कोणत्याही एका उपश्रेणीमध्ये कमी-सबस्क्रिप्शन असेल तर सेबी आयसीडीआर नियमांनुसार, वैध बोली ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक बोली लागल्यास, गैर-संस्थात्मक श्रेणीच्या इतर उपश्रेणीतील बोलीदारांना त्याचे वाटप केले जाऊ शकते.
ऑफरचा किमान 35% भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल कॅटेगरी“) वाटपासाठी उपलब्ध असेल. सेबी आयसीडीआर नियमांनुसार, ऑफर किमतीच्या किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर त्यांच्याकडून वैध बोली लागल्यासच तो उपलब्ध होईल. सर्व बोलीदार (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) या ऑफरमध्ये केवळ ब्लॉक केलेल्या रकमेद्वारे समर्थित अर्ज (“ASBA“) प्रक्रियेद्वारेच सहभागी होतील आणि त्यांच्या संबंधित बँक खात्याची माहिती (UPI बोलीदारांच्या बाबतीत UPI आयडीसह) देतील. या अंतर्गत बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँका (“SCSBs“) किंवा प्रायोजक बँकेद्वारे (बँक) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टर्सना ASBA प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, RHP च्या पृष्ठ 403 वरून सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” पहा.

