~ बिगरॉक मोटरस्पोर्ट्सच्या मॅट मॉस (ऑस्ट्रेलिया) ने कावासाकीवर स्वार होत ४५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गाचे विजेतेपद पटकावले. ~
~ बीबी रेसिंगच्या हंटर श्लॉसर (अमेरिका) ने होंडावर स्वार होत २५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात सर्वोच्च सन्मान मिळवला. ~
~ गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या बेन हॉलग्रेन (थायलंड) ने केटीएमवर अप्रतिम कामगिरी करत २५०सीसी इंडिया-एशिया मिक्स वर्गात विजय मिळवला.
पुणे: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सीझन २ ची सुरुवात पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे अतिशय थरारक वातावरणात झाली, जिथे होम टीम बीबी रेसिंग ने आज विजेता म्हणून बाजी मारली. जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीगच्या उद्घाटन फेरीत अखंड रोमांच, जबरदस्त गती, आणि थरारक स्पर्धा अनुभवायला मिळाली. हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सना प्रकाशझोतात रोमांचक शर्यतीत एकमेकांविरुद्ध झुंजताना पाहिले.
सीझनच्या पहिल्या फेरीत बीबी रेसिंग टीमने संघ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून आगामी हंगामासाठी जोरदार सूर लावला. ४५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात बिगरॉक मोटरस्पोर्ट्सच्या मॅट मॉस (ऑस्ट्रेलिया) यांनी कठीण ट्रॅकवर अप्रतिम नियंत्रण दाखवत कावासाकीवर स्वार होऊन विजय मिळवला. २५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात हंटर श्लॉसर (अमेरिका) यांनी होंडावर अप्रतिम गती आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. २५०सीसी इंडिया–एशिया मिक्स वर्गात गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या बेन हॉलग्रेन (थायलंड) यांनी जोरदार प्रदर्शन करत शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला.
रेस सप्ताहांतात ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि थायलंडसारख्या देशांतील रायडर्ससोबत भारतातील प्रतिभावान रायडर्स रुग्वेद बार्गुजे, इक्षान शानबाग आणि प्रज्वल विश्वनाथ यांनीही सहभाग घेतला. या हंगामात २१ देशांतील ३६ हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाल्याने भारत आता जागतिक सुपरक्रॉस प्रतिभेसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.
कार्यक्रमात राईज मोटो फॅन पार्क देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे चाहत्यांसाठी इंटरॅक्टिव्ह गेम झोन, खाद्य स्टॉल्स, लाईव्ह संगीत आणि खास वस्तूंचे स्टॉल्स होते. हजारो उत्साही प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या या फेरीने सीझन २ ला भव्य सुरुवात करून दिली आणि भारतात सुपरक्रॉसची वाढती लोकप्रियता अधोरेखित केली.
ISRL चे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणाले:“आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायडर्स भारतीय खेळाडूंसोबत भारतीय भूमीवर स्पर्धा करताना पाहणे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारत आता फक्त प्रेक्षक नाही, तर जागतिक मोटरस्पोर्ट्समधील एक गंभीर स्पर्धक बनत आहे. आमचे ध्येय नेहमीच युवा रायडर्सना प्रोत्साहन देणारे, पुढील पिढीला प्रेरणा देणारे आणि भारताला जागतिक सुपरक्रॉस नकाशावर ठळकपणे स्थान मिळवून देणारे व्यासपीठ तयार करणे हेच राहिले आहे.”
ISRL चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले:
“पुण्यात मिळालेला अप्रतिम प्रतिसाद पुन्हा एकदा सिद्ध करतो की भारताला रेसिंगची खरी आवड आहे. स्पर्धेचा दर्जा, चाहत्यांचा उत्साह आणि कार्यक्रमाचा विस्तार हे दाखवतात की भारतातील मोटरस्पोर्ट्स झपाट्याने विकसित होत आहेत. ही फक्त शर्यत नाही, तर मनोरंजन, नाविन्य आणि समुदायभावना एकत्र आणणारी नवी क्रीडा चळवळ आहे.”
आता दुसरी फेरी ६–७ डिसेंबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये होणार असून ग्रँड फिनाले २०–२१ डिसेंबर २०२५ रोजी कोझिकोड (केरळ) येथे पार पडणार आहे.
पुण्याच्या होम टीम बीबी रेसिंगने इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सीझन २ ची पहिली फेरी गाजवली
Date:

