पुणे- पुणे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीच्या वतीने जैन मंदिर व बोर्डींग हाऊसची जागा गिळंकृत करणाऱे गोखले बिल्डर व त्यांचे भागीदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
सदर प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे आपल्या भाषणात म्हणाले की, पुणे शहरातील जैन मंदिर व बोर्डींग हाऊसची कोट्यावधी रूपयांची जागा कवडीमोल भावाने दादागिरी करून ताब्यात घेऊन एक दिवसात सर्व परवानग्या घेण्यात आल्या. या कोट्यावधी रूपयांच्या जागेत कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा व जैन समाजाला न्याय द्यावा. तसेच मुरली मोहोळ यांनी पुणे शहरामध्ये केलेले अनेक जमिन घोटाळे यांची सुध्दा चौकशी करण्यात यावी. अशा या घोटाळेबाज मंत्र्याला मुख्यमंत्री महोदय पाठिशी घालण्याचे काम करीत आहे याचा अर्थ त्यांचा सुध्दा सहभाग या घोटाळ्यामध्ये दिसत आहे.’’
यावेळी महाष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, मेहबुब नदाफ, राजेंद्र भुतडा, उस्मान तांबोळी, संतोष आरडे, महिला अध्यक्ष स्वाती शिंदे, प्राची दुधाने, अर्चना शहा, सिमा सावंत, उषा राजगुरू, माया डुरे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, राजू ठोंबरे, रमेश सकट, भरत सुराणा, अरुण कटारिया, लतेंद्र भिंगारे, फिरोज शेख, रवि आरडे, देवीदास लोणकर, नुर शेख, अभिजीत महामुनी, संतोष सुपेकर, चेतन पडवळ आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

