Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘गिव्ह विथ डिग्निटी™’ उपक्रमाच्या पाच वर्षांच्या यशाचा फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून उत्सव साजरा

Date:

करुणा आणि सामूहिक सद्भावना यांच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा हा उत्सव; या उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्सवी ‘डिग्निटी किट्स’च्या माध्यमातून वंचित घटकांचे सशक्तीकरणाचा प्रयत्न.

पुणे२७ ऑक्टोबर, २०२५ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि या कंपनीची सीएसआर शाखा मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) यांनी त्यांच्या ‘गिव्ह विथ डिग्निटी™’ अभियानाचा पाचवा वर्षपूर्ती सोहळा नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला. २०२० मध्ये कोविड साथीच्या काळात सुरु झालेला हा उपक्रम आज देशभर आशा आणि सकारात्मकतेचे प्रतिक बनला आहे.

एमएमएफ आणि फिनोलेक्स यांच्या टीमने पारंपरिक उत्सवी भेटवस्तूंच्या ऐवजी ‘गिव्ह विथ डिग्निटी™’ या उपक्रमाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. या उपक्रमाद्वारे त्यांनी दुर्लक्षित आणि वंचित समुदायांना मदत पोहोचवण्यासाठी आपली संसाधने वळवली आहेत. या माध्यमातून रिक्षाचालक, रोजंदारीवर काम करणारे कामगार, दिव्यांग व्यक्ती, शेतमजूर, तसेच ट्रान्सजेंडर आणि आदिवासी समुदाय अशा देशभरातील अनेक घटकांपर्यंत एमएमएफ आणि फिनोलेक्स हे पोहोचले आहेत.

बचत गट, स्थानिक लघु उद्योग, महिला उद्योजक यांच्या सहकार्याने एमएमएफ ही संस्था धान्य, उत्सवी भेटवस्तू आणि स्वच्छता किट्सचे संकलन, निर्मिती आणि वितरण करते. या उपक्रमातून केवळ गरजू लोकांच्या उपजीविकेला आधार मिळतोच, त्याशिवाय “स्थानिक वस्तू खरेदी करा, स्थानिक वस्तू द्या” या तत्त्वज्ञानातून स्थानिक समुदायांनाही बळकटी मिळते. या प्रत्येक किटमध्ये काही वस्तूंचा आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. त्यातील दिवे हे दिव्यांग व्यक्तींनी हस्तकलेने तयार केलेले असतात. त्यामुळे ‘देणे’ ही कृती एक ‘उत्पन्न कमावण्याची’ साखळी बनते. या उपक्रमाच्या पाचव्या वर्षात, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या ११ राज्यांमध्ये एकूण १० हजार किट्स वितरित करण्यात आले.

२०२० मध्ये सुरू झाल्यापासून ‘गिव्ह विथ डिग्निटी™’ उपक्रमाने कॉर्पोरेट, देणगीदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २४ राज्यांतील तीन लाखांहून अधिक व्यक्तींना सहाय्य केले आहे. २०२० ते २०२५ या कालावधीत, एमएमएफच्या टीमने या उपक्रमाद्वारे एक लाखाहून अधिक ‘डिग्निटी किट्स’ वितरित केल्या, १२० बचत गटांना खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केले आणि ३० गटांना एमएसएमई म्हणून नोंदणी करण्यास मदत केली. या उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळात ४० कॉर्पोरेट कंपन्यांनी (त्यांपैकी सहा बहुराष्ट्रीय कंपन्या) भाग घेतला होता आणि ४५०० हून अधिक फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना मदत करण्यात आली होती. त्यावेळी त्यास १० राज्यांच्या प्रमुखांचा आणि मान्यवरांचा पाठिंबा मिळाला होता.

या उपक्रमाबद्दल बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही दिवाळीमध्ये केवळ किट्सचे वाटप केले नाही, तर आशा, सन्मान आणि मानवी सहृदयता या भावनाही लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. सणाचा आनंद समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत, विशेषतः दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. इतरांना उभे करणे आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश पसरवणे हा सण साजरा करण्य़ाचा खरा अर्थ असतो, यावर आमची श्रद्धा आहे. हा उपक्रम हे त्याचेच प्रतिक आहे. कोविड साथीच्या काळातही पुढे येऊन आम्हाला साथ देणाऱ्या सर्व कॉर्पोरेट्सचे, देणगीदारांचे आणि स्थानिक भागीदारांचे मी मनःपूर्वक आभार मानते. एकत्र येऊन प्रयत्न केल्यास कोणतीही अडचण पार करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. २०२०मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल मी फिनोलेक्सचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळ यांची मनापासून कृतज्ञ आहे. दरवर्षी हा उपक्रम आम्हाला आठवण करून देतो की करुणेचा एक थेंबसुद्धा कल्पनेपलीकडील बदल घडवू शकतो आणि समाजात एकता व सन्मान यांच्या भावना निर्माण करू शकतो.”

‘गिव्ह विथ डिग्निटी™’ हा उपक्रम कोविडच्या काळात रुजलेले एक स्वप्न आहे. दरवर्षी ते अधिकाधिक बळकट होत आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि कंपनीची सीएसआर भागीदार संस्था मुकुल माधव फाउंडेशन या सक्षम आणि आत्मनिर्भर समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध आहेत. आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांत त्या सातत्याने काम करतात. समाजाचे ऋण फेडून भारतभरातील असंख्य नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणण्यावर दोन्ही संस्थांचा विश्वास आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...