● राईज मोटो फॅन पार्क दुपारी 2 वाजता खुले होईल | उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6:20 वाजता | शर्यती रात्री 7 वाजल्यापासून शिव छत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे सुरू होतील
● जगभरात थेट प्रक्षेपण ISRL यूट्यूब आणि रेव टीव्ही कॅनडा वर
● भारतात थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडिया आणि फॅनकोड वर
पुणे – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सीजनचा पहिला राऊंड रविवारी, 26 ऑक्टोबरला शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी येथे पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील सर्वोत्तम रायडर्स जेव्हा जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीगमध्ये गौरवासाठी लढतील, तेव्हा प्रेक्षकांसाठी हा विकेंड रोमांचक ठरणार आहे.
दमदार स्पॉन्सर लाइन–अप
आयएसआरएलने राऊंड 1 साठी मजबूत स्पॉन्सर पूल निश्चित केला आहे. यात राईज मोटो, लिलेरिया ग्रुप, बिसलेरी, कावासाकी इंडिया, टीव्हीएस अपाचे, रेड बुल आणि मॅक्स प्रोटीन यांसारख्या अग्रगण्य ब्रँड्सचा समावेश आहे. यावरून भारतातील सुपरक्रॉस इकोसिस्टमबद्दल वाढत चाललेला व्यावसायिक आत्मविश्वास अधोरेखित होतो.
विकेंड शेड्यूल
शनिवार, 25 ऑक्टोबरला सराव सत्रे होतील. त्यानंतर रविवार, 26 ऑक्टोबरला सहा ग्लोबल टीम्स शर्यतींच्या पहिल्या राऊंडमध्ये उतरणार आहेत. पुण्यातील हा अॅक्शन-पॅक्ड रविवार राईज मोटो फॅन पार्कसोबत सुरू होईल. येथे प्रेक्षकांना लाईव्ह म्युझिक, इंटरॅक्टिव्ह झोन्स, फूड स्टॉल्स आणि टीम मर्चेंडाईजसह एक अद्वितीय अनुभव मिळेल.
संध्याकाळी उत्साही ओपनिंग सेरेमनी आणि प्री-शो होईल, ज्यामध्ये टीम इंट्रोडक्शन्स आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस असतील. त्यानंतर प्रेक्षकांची सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या आयएसआरएल राऊंड 1 रेस लाईट्सखाली रंगणार आहेत.
| वेळ | कार्यक्रम |
| 2:00 PM – 6:00 PM | राईज मोटो फॅन पार्क एक्स्पेरियन्स |
| 5:00 PM | स्टेडियमचे गेट उघडणार |
| 6:15 PM – 7:00 PM | उद्घाटन समारंभ आणि प्री-शो |
| 7:00 PM – 8:30 PM | आयएसआरएल राउंड १ रेसेस |
स्ट्रीम आणि कसे पाहणार
जे चाहते थेट स्टेडियममध्ये सर्व थरार अनुभवू इच्छितात, त्यांच्यासाठी तिकीटांची सुविधा बुकमायशोवर उपलब्ध आहे. तर दूरवरून पाहणाऱ्यांसाठी आयएसआरएल सीजन 2 चे थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडियावर होणार आहे. तसेच हे सामने जगभरातील प्रेक्षकांसाठी आयएसआरएल चॅनेलवर यूट्यूबवर थेट स्ट्रीम केले जाणार असून, फॅनकोडवर ऑन-डिमांड उपलब्ध असतील. कॅनडामधील सुपरक्रॉस चाहत्यांसाठी विशेष थेट प्रक्षेपण रेव्ह टीव्हीवर पाहता येईल.
वीर पटेल, डायरेक्टर, इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग म्हणाले : “सीजन 2 हा केवळ रेसिंगपुरता मर्यादित नाही, तर तो चाहत्यांना सुपरक्रॉसच्या थरार, ऊर्जा आणि आवेशाच्या आणखी जवळ नेणारा आहे. या विकेंडला पुणे खेळ, मनोरंजन आणि फॅन कल्चरच्या नव्या युगाचे साक्षीदार ठरणार आहे.”
सीजन 2 कॅलेंडर
● पुणे – ऑक्टोबर 25 आणि 26, 2025 – श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी
● हैदराबाद – डिसेंबर 6 आणि 7, 2025 – गाचीबौली स्टेडियम
● कोझिकोड (ग्रँड फिनाले) – डिसेंबर 20 आणि 21, 2025 – ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियम

