एरोस्पेस व कंझ्युमर सेगमेंटमध्ये पूर्णपणे व्हर्टिकली इंटिग्रेटेड उत्पादन क्षमता सादर करण्यासाठी भारतात एका सिंगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कार्यरत एकमेव प्रिसिजन कॉम्पोनंट (अचूक घटक) उत्पादक एक्वस लिमिटेड (“एक्वस”) (स्रोत: F&S अहवाल) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे 720 कोटी रु. पर्यंत फ्रेश कॅपिटल उभारणार आहे.
एक्वसने फ्रेश इश्यूसाठी अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP1) दाखल केले असून त्यामध्ये 720 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय, ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 31,772,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आहेत.
एक्वसचे नेतृत्व स्वतंत्र प्रवर्तक, कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिवपुत्रप्पा मेलिगेरी करत असून ते कंपनीला धोरणात्मक दृष्टीकोन देत नेतृत्व करत आहेत. तसेच, कंपनीकडे अनुभवी व्यवस्थापन संघ असून त्यांना या उद्योग क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय, अमायकस कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी I एलएलपी, अमायकस कॅपिटल पार्टनर्स, अमांसा इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, स्टेडव्ह्यू कॅपिटल मॉरिशस लिमिटेड, कॅटामरान एकम् आणि स्पार्टा ग्रुप एलएलसी हे गुंतवणूकदार एकत्रितरीत्या ऑफरपूर्व इक्विटी शेअर भांडवलातील 25.54% हिस्सा धरून आहेत.
जरी एक्वस प्रामुख्याने एरोस्पेस क्षेत्रात कार्यरत असले तरी गेल्या काही वर्षात कंपनीने कंझ्युमर क्लायंट साठी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, प्लॅस्टिक्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचा समावेश केला आहे. यामध्ये कुकवेअर सारखी कंझ्युमर ड्युरेबल्स, प्लॅस्टिक्स (आउटडोअर टॉयज, फिगरिन्स), तसेच पोर्टेबल कॉम्प्युटर्स आणि स्मार्ट डिव्हाइसेस सारखी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी कॉम्पोनंट्स यांचा समावेश आहे.
आयपीओ मधील फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनी खालील उद्देशांसाठी करणार आहे: 1. कंपनी उपकंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी आणि तिच्या दोन संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्वस कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची संपूर्ण/अंशतः परतफेड किंवा प्रीपेमेण्ट (जिथे लागू असेल तिथे प्रीपेमेण्ट पेनल्टीसह) करण्यासाठी;
2. कंपनी आणि तिची एक उपकंपनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी भांडवल खर्चाला निधी पुरवण्यासाठी आणि 3. अजून काही अधिग्रहणांद्वारे, इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनओर्गानिक विकासाला निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापर करणार आहे.
एक्वसने 2009 मध्ये एरोस्पेस ग्राहकांसाठी बेलगावी मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमधील युनिट्समध्ये एरो-स्ट्रक्चर कॉम्पोनंट्स आणि एरो-इंजिन कॉम्पोनंट्सचे उत्पादन सुरू केले. मागील 15 वर्षांमध्ये, कंपनीने सातत्याने नवीन उत्पादन क्षमता विकसित करून आणि त्यांचे अधिग्रहण करून विकास साधला आहे. यामुळे एरोस्पेस आणि कंझ्युमर सेगमेंटमध्ये पोर्टफोलिओ आणि ग्राहकवर्ग दोन्ही वाढले आहेत. कंपनीने 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे उत्तर अमेरिका आणि फ्रान्समध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून धोरणात्मकदृष्ट्या उत्पादन कामकाजाचा विस्तार केला. त्यामुळे एरोस्पेस क्षेत्रातील नवीन क्षमता कंपनीला मिळाली, उत्तर अमेरिका व युरोपमध्ये कंपनीने आपले स्थान विस्तारले आणि उत्पादन पोर्टफोलिओ वाढविला.
गेल्या काही वर्षात एक्वसने स्वतःला ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण जागतिक पुरवठादार म्हणून प्रस्थापित केले आहे. कंपनीच्या मुख्य ग्राहक/क्लायंट्स मध्ये एरोस्पेस विभागात—एअरबस, बोइंग, बॉम्बार्डियर, कॉलिन्स एरोस्पेस, स्पिरिट एरोसिस्टम्स इंक, सफ्रान, GKN एरोस्पेस, म्यूबेया एरोस्ट्रक्चर्स, हनीवेल, ईटन आणि साब्का; तर कंझ्युमर विभागात—हासब्रो, स्पिनमास्टर, वंडरचेफ आणि ट्रॅमोंटिना यांचा समावेश आहे.
एक्वसने ग्राहकांना आवश्यक असलेल्या जटिल आणि विशेष उत्पादनांच्या उत्पादनासाठी संयुक्त कंपन्यांच्या परस्पर पूरक तज्ज्ञतेचा लाभ घेत नवीन उत्पादने विकसित करण्याच्या आणि अभियांत्रिकी उपायसुविधा सादर करण्याच्या क्षमता विस्तारासाठी संयुक्त कंपन्यांमध्ये प्रवेश केला. कंपनीचा संयुक्त उपक्रम SQuAD फॉर्जिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“SQuAD”) ने कंपनीला इंजिन्स, लँडिंग गियर आणि ब्रेकिंग सिस्टम घटकांसाठी लहान ते मध्यम आकाराचे एरोस्ट्रक्चरल भाग अल्युमिनियम, स्टील, टायटॅनियम किंवा निकेल-आधारित मिश्रधातूंमध्ये तयार करणे यामध्ये सुधारित क्षमतांनी सुसज्ज केले आहे. जोडीला कंपनीची मॅगेलन एरोस्पेस लिमिटेड, कॅनडा च्या साथीने एरोस्पेस प्रोसेसिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“API”) ही संयुक्त कंपनी 2007 मध्ये स्थापन झाली. तिने कंपनीला नाविन्यपूर्ण सरफेस ट्रीटमेंट उपायसुविधा पुरविण्यास सक्षम केले आहे. कंपनीची ट्रॅमोंटिना सोबतची संयुक्त कंपनी एक्वस कुकवेअर प्रायव्हेट लिमिटेड नाविन्यपूर्ण ग्राहक उत्पादने विकसित करण्यासाठी तांत्रिक क्षमतांनी सुसज्ज आहे.
एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागांमध्ये दोन दशलक्ष चौ.फूटांहून अधिक उत्पादन जागांसह एक्वस भारतातील उत्तर कर्नाटक मधील तीन अद्वितीय, अभियांत्रिकी-आधारित व्हर्टिकली इंटिग्रेटेड व्हर्टिकली इंटिग्रेटेड अचूक उत्पादन क्षमता “इकोसिस्टिम्स” मध्ये कार्यरत आहे. याशिवाय, एक्वस एरोस्पेस विभागासाठी शोलेट (फ्रान्स) आणि पॅरिस, टेक्सास (यू.एस.)मध्ये दोन समर्पित प्रिसिजन कॉम्पोनंट उत्पादन सुविधा केंद्रही चालवते.
भारतामधील तीन उत्पादन इकोसिस्टिम्स आणि भारताबाहेरील दोन समर्पित एरोस्पेस सुविधा यांमध्ये, एक्वसकडे एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागातील उत्पादनांसाठी 2,919,058 वार्षिक मशीनिंग/मोल्डिंग तास क्षमता असून, एरोस्पेस विभागासाठी 200 पेक्षा जास्त कंप्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (“CNC”) मशीन आणि कंझ्युमर उत्पादनांसाठी 161 मोल्डिंग मशीन 31 मार्च, 2025 पर्यंत वापरात आहेत.

