पोलीस स्मृतिदिन संचलन २१ ऑक्टोबर २०२५ शोक कवायत

लडाख येथे दि.२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी, सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्व तयारी निशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. पोलीस स्मृतिदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.
मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना, वीरमरण आले, अशा संपुर्ण भारत देशातील सर्व राज्य, केद्रातील निमलष्करी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार/जवान यांचे स्मृतिला आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७/३० वा.ते ०८/३० वा.चे दरम्यान पाषाण रोड स्थित महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ०८/०० वा. मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री पुणे व वीड जिल्हा यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली. सदर क्रार्यक्रमास श्री. संजीवकुमार सिंघल महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई, श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे, श्री. दीपक पाण्डये अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे, श्री. सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच पुणे शहरातील सर्व कार्यरत व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री पुणे व बीड जिल्हा, श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप सिंह गिल्ल पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री. संजय पाटील अपर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर उपस्थित इतर मान्यवर, पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
दि.१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील १. पोलीस कॉन्स्टेवल महेश कावडु नागुलवार या पोलीस जवानाला कर्तव्यावर असताना शहिद झाले.
दि.१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आपले कर्तव्य बजावित असताना, वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण १९१ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीचे दरम्यान श्री. सुनिल जैतापुरकर सहा. पोलीस आयुक्त, नियंत्रण कक्ष, अभियान, पुणे शहर व श्री. सरदार पाटील, सहा. पोलीस आयुक्त, मानव संशाधन, पुणे शहर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. सिताराम नरके, सेवानिवृत्त, सहा. पो. फौज. एसआरपीएफ, ग्रुप-२. रामटेकडी, पुणे व दत्तात्रय निकम, पोलीस अंमलदार, पिंपरी पो. स्टे यांनी केले.

