नवनव्या डिझाईन्सची माहिती देणारी पुस्तके, नामांकित फर्निचर ब्रँण्डसोबत भागीदारी, अर्काइव्ह गॅलरी आणि फर्निचर दुकानातच कांदळवनाच्या जंगलाचे महत्त्व पटवून देणारे कॅफे आदी वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध
मुंबई: घरातील फर्निचर निवडताना प्रत्येक भारतीयाला उत्कृष्ट डिझाईन मिळावी, ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव यावा याकरिता गोदरेज एन्टरप्राइज ग्रुपच्या अग्रगण्य फर्निचर ब्रँण्ड असलेल्या इंटरियो बाय गोदरेज ने आपल्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत राहून, मुंबईतील विक्रोळी येथे फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान सुरु केले आहे.

विक्रोळी येथील २२ हजार चौरस फूट या विस्तीर्ण जागेवर इंटेरियो बाय गोदरेज फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान उभारण्यात आले आहे. नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानातून इंटरिओ हा ब्रँण्ड आपली नवी ओळख ग्राहकांसमोर आणत आहे. घरात आधुनिक भारतीय जीवनशैली दिसावी म्हणून हे फर्निचर खरेदीचे दुकान वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून उभे राहिले आहे. फर्निचरनिर्मितीचा वारसा, कारागिरांची कामगिरी आणि ग्राहकांच्या गरजेनुसार बदलता येणारे डिझाईन्स यांचा मिलाफ म्हणजे इंटरियो बाय गोदरजेचे फर्निचर. ग्राहकांनी या नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानाला भेट दिल्यास त्यांना मॉड्युलर, बदलण्यायोग्य आणि वैयक्तिकृत फर्निचरच्या नवनव्या रेंज पाहता येतील. यासह गेमिंग, आउटडोअर, लहान मुलांचे फर्निचरही येथे खरेदी करता येईल. ग्राहकांना फर्निचर खरेदीत सॉफ्ट फर्निशिंगची नवी रेंजही पाहता येईल.

गोदरेज एन्टरप्राईजेस ग्रुपचे कार्यकारी संचालक नायका होळकर म्हणाले, ‘‘ विक्रोळी येथील आमच्या फर्निचरच्या मुख्य खरेदीच्या दुकानात डिझाइन आणि कलाकुसर यावर खास लक्ष दिले जाते. ही खास योजना आमच्या शंभर वर्षांची वारसागत परंपरा दर्शवते. पारंपरिक वारसा जतन करताना आम्ही आधुनिक राहणीमान आणि कामाच्या पद्धतीचा स्विकार केला आहे, हे नव्या फर्निचरच्या निर्मितीतून दिसून येते. इंटेरिओ बाय गोदरेज हा ब्रँण्ड भारतीय घर आणि कार्यालयासाठी नव्या डिझाईन्स सादर करत आहे. हे डिझाईन्स मॉड्युलर स्वरुपातही उपलब्ध आहेत. ग्राहकांना नव्या रचनेतील फर्निचर सोयीनुसार बदला येतील. या डिझाईन्समधून आधुनिक विचारही अभिव्यक्त होतात. ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे डिझाईन्स मिळतील. नव्या फर्निचरच्या दुकानातच आमच्या दृष्टीकोनातून उभारलेले इन हाऊस द मँग्रोव्ह किचन कॅफे पाहिल्यास आमचे विचार प्रतिबिंबित आहे. आपण ज्या प्रकारे आपले घर किंवा इतर जागा तयार करतो त्यातून आपल्या पृथ्वीचेही भविष्य आकार घेते, हे कॅफेच्या निर्मितीतून दिसून येतो.’’
आगामी आर्थिक वर्ष २०२९पर्यंत देशभरात विविध स्वरुपाची ५०० नवीन फर्निचर खरेदीची दुकाने सुरु केली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा इंटेरियो बाय गोदरजेने केली आहे. यात फर्निचर खरेदीच्या मोठ्या दुकानासह लहान आकारच्या इंटेरिओ स्टुडियोजचाही समावेश असेल.
गोदरेच्या विक्रोळी येथील फर्निचर खरेदीच्या दुकानात फर्निचर खरेदीसह इतर काही वैशिष्ट्यपूर्ण रचनाही पाहता येतील. विक्रोळीतील हिरव्यागार खारफुटीच्या जंगलापासून प्रेरणा घेऊन या दुकानात मँग्रोव्ह किचन हे इन-स्टोअर कॅफे उभारण्यात आले आहे. नजीकच्या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचा उत्सव साजरा करता येईल अशा पद्धतीने कॅफेची रचना करण्यात आली आहे. घरातले डिझाइन्स निवडण्यासाठी तीन क्युरेटेड लूक बुक्सही सादर करण्यात आले आहेत. घरातले प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्यासाठी इंटेरियो बाय गोदरेजच्या नव्या डिझाईन्स यात पाहता येतील.
विक्रोळीतील फर्निचर दुकानाला भेट देणा-या ग्राहकांनी आर्काइव्ह गॅलरीलाही जरुर भेट द्यावी. हे डिझाईन गोदरेजच्या समृद्ध डिझाईनच्या वारशाचा अनुभव देते. यात १०० वर्ष जुन्या भारतीय घरांतील तसेच कार्यालयातीन गोदरेजची तत्कालीन डिझाईन्सही पाहता येतील.
इंटेरिओ बाय गोदरेजचे व्यापार प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष स्वप्नील नागरकर म्हणाले, ‘‘आम्ही कंपनीच्या नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानात ग्राहकांसोबतचे नाते अधिक दृढ करण्यावर प्रयत्नशील आहोत. प्रत्येक ग्राहकाला आपले घर आपापल्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीनुरुप हवे असते. भारतीय फर्निचर ब्रँण्ड्ससोबतचे आमचे सहकार्य, पहिल्यांदाच फर्निचर खरेदी दुकानात सुरु केलेले कॅफे या सर्व नवीन कल्पना इंटेरिओची आधुनिकता तसेच सर्वांना सामावून घेणारी आणि डिझाईन्सची संकल्पना आणि दैनंदिन जीवनाला प्रेरणा देण्याची आमची बांधिलकी दर्शवते. आम्ही व्यवसाय वृद्धीवर लक्ष केंद्रित करत आहोत. यात व्यापाराची व्यापकता वाढवताना डिझाईन्स, नवनव्या अंमलबजावणीतील अचूकता यांचा समन्वय साधून इंटरओ बाय गोदरेज हा आधुनिक भारतीय घरे आणि कार्यक्षेत्रांसाठी पसंतीचा जीवनशैली ब्रँण्ड म्हणून स्थापित होत आहे. २०२९ पर्यंत देशभरात किरकोळ विक्री केंद्रे वाढवणे, १ हजाप ५०० पर्यंत फर्निचर खरेदीची दुकाने स्थापन करणे हे आमच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. भविष्यातील हे उद्दिष्ट काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीचे मार्ग योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावेत, याकरिता काम केले जाईल. ब्रँण्डच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रयत्नांसाठी कटिबद्ध आहोत. आमच्या सर्व प्रयत्नांना गोदरेजच्या विश्वास आणि भरवशाची जोड असल्यामुळे ही उत्पादने ग्राहकांना अधिक आश्वस्त वाटतात.’’
विक्रोळीतील विस्तीर्ण जागेत उभारलेल्या फर्निचर खरेदी दुकानाची संकल्पना आणि अंतर्गत रचना मजुमदार ब्राव्हो आर्किटेक्ट्स या वास्तुकला कंपनीने तयार केली आहे.
इंटेरिओने अनेक नामांकित फर्निचर ब्रँण्डसोबत भागीदारी केली आहे. आधुनिक भारतीय सौंदर्यदृष्टीचे प्रतिनिधित्व करणा-या भारतीय कारागिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. अदिगामी स्टुडिओ बाय अदिती अनुज, बी.आर.पंडित, केन कॉन्सेप्ट, हेअररुम नागा, मकान बाय ताहिर सुलताना, ऊर्जा, सिरोही, स्वभू कोहली या प्रसिद्ध कंपन्यांसोबत इंटेरिओने भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे भारतीय कलाकुसरीचे उत्कृष्ट नमुने जागतिक स्तरावर सादर करता येईल.
नुकतेच विक्रोळी येथीन फर्निचर खरेदी दुकानाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर डेव्हिड अब्राहम यांच्यासोबत फायरसाइड चॅट या अनौपचारिक गप्पांचे आयोजन करण्यात आले. भारतीय डिझाइनवर बॉहॉस चळवळीच प्रभाव कसा पडला, याबद्ल त्यांनी माहिती दिली. याव्यतिरिक्त अरन माईल्स यांनी घर किंवा कार्यालयात विचारपूर्वक नियोजनातून डिझाईन केलेली सुंदर जागा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण रते हा खास अनुभव सर्वांसमोर डिजीटल माध्यमातून मांडला.
नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानामुळे गेल्या महिन्यात इंटरिओ बाय गोदरेजच्या री-ब्रँडिंगला नवी ओळख मिळाली आहे. शंभर वर्ष विश्वासार्हतेचा ब्रँण्ड इंटेरिओ बाय गोदरेज हा ब्रँण्ज आता डिझाईन ओरिएंटेड जीवनशैली ब्रँण्ड म्हणून नावारुपास येत आहे. चमकदार कोरल रंगाच्या लोगोसह ही नवी ओळख ब्रँण्डची सर्जनशीलता, उबदारपणा आणि आधुनिक भारताचा आत्मा यांना समरस ठरणारे उत्पादन उपलब्ध करुन देत असल्याचे दर्शवते.

