पुणे-: पिंपरी चिंचवड महापालिकेवर विकास कामांच्या नावावर 22 हजार कोटींचे कर्ज तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात झाल्याची चर्चा सध्या शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे .याबाबत प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी बोलून वस्तुस्थितीची माहिती घेऊ असे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले
2022 मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी व प्रशासक म्हणून शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी महापालिकेकडे सहा हजार कोटी रुपये शिल्लक होते. गेल्या तीन वर्षात आयुक्त शेखर सिंह यांनी विविध विकास कामांच्या नावाखाली भरमसाठ खर्च केल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात येत होता. परंतु याकडे एकाही माजी नगरसेवकाने कधीच लक्ष दिले नाही. विविध विकास कामांचे ऑडिट करणे गरजेचे आहे .जुना मुंबई पुणे रस्ता हा 61 मिटर रुंदीचा असताना पादचारी मार्गाचे रुंदीकरण करून हा मार्ग 45 मीटर पर्यंत अरुंद करण्यात आला . त्यामुळे सध्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे या खर्चाची खरेच गरज होती का हा प्रश्न उपस्थित केला जातो . याशिवाय शहरातील विविध ठिकाणचे पादचारी मार्ग रुंद करून डीपी चे रस्ते अरुंद करण्यात आले. भविष्यात वाहतूक कोंडी झाल्यास पुन्हा हे रस्ते खोदून रुंद करावे लागतील .म्हणजेच गरज नसताना आयुक्तांनी हा खर्च केल्याचे दिसून येते.
याशिवाय नदी सुधार प्रकल्प राबवून नदीपात्राचे रुंदीकरण कमी करण्याचा घाट त्यांनी घातला. या प्रकल्पासाठी नागरिकांनी आणि पर्यावरणवादी लोकांनी विरोध केला असताना देखील हा प्रकल्प राबवण्याचा घाट त्यांनी सुरूच ठेवला .अनेक विकास कामांचा खर्च आवाजवी करून महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांच्या विकास कामांवर कोणाचाही आणि कोणताही दबाव नव्हता. त्यामुळे त्यांनी मनमानी कारभार केला .दोनशे कोटी रुपयांचे बॅाड खरेदी करून महापालिकेला कर्जात लोटले. आजपर्यंत महापालिकेला विकास कामांसाठी कधीच कर्ज काढण्याची वेळ आली नव्हती .
याशिवाय चिखली येथील अतिक्रमण तोडण्यासाठी केलेला भरमसाठ खर्च हा देखील चर्चेचा विषय आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राहटणी येथील कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी आपण याबाबत माहिती घेऊ. आपली महापालिकेवर सत्ता असताना कधीच कर्ज काढण्याची वेळ आणली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. प्रभारी आयुक्त हर्डीकर यांना वस्तुस्थितीची माहिती विचारून घेऊ असे सांगितले.
आयुक्त शेखर सिंह यांची बदली नाशिक येथे झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. हा सत्कार कोणी केला? आणि सत्कार मंचावर कोण उपस्थित होते याबाबत विविध चर्चा आहे. ज्यांनी पालिकेला लुटण्यासाठी आयुक्तांना सहकार्य केले अशाच मंडळींनी हा सत्कार केला आहे. यामध्ये ठेकेदार मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. महापालिकेची तिजोरी तात्कालीन आयुक्त शेखर सिंह हे रिकामी करत आहेत याची माहिती माजी नगरसेवकांना असतानाही त्यांनी याबाबत का आवाज उठवला नाही ?हे एक गैाड बंगाल आहे अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.

