गुजरातच्या वडोदऱ्यात नाव उलटून अपघाताची एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोन शिक्षकांसह दहा विद्यार्थी असा बारा जणांचा मृत्यू झाला आहे. हरणी नदीत बोट पलटल्यानं ही दुर्घटना घडली आहे. शाळेच्या ट्रिपसाठी हे विद्यार्थी गेलेले असताना ही दुर्घटना घडली आहे. यामुळं गुजरातमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

