आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत विक्री मूल्य 670 कोटी रु., मागच्या तिमाहीच्या तुलनेत 9% वाढ
आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत संकलन 596 कोटी रुपये, गेल्या तिमाहीच्या तुलनेत 8% वाढ
आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीतील उत्पन्न प्रति चौरस फूट 7,823 रुपये, मागील तिमाहीच्या तुलनेत 7% वाढ
पुणे, 15 ऑक्टोबर 2025: मुंबई आणि बेंगळुरूमध्ये आपल्या कामाने ठसा उमटवणारी पुणे येथील आघाडीची रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडने (BSE: 532924, NSE: KOLTEPATIL; KPDL) 30 सप्टेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाही दरम्यान त्यांच्या रिअल इस्टेट ऑपरेशन्सवरील प्रमुख अपडेट्स जाहीर केले आहेत.
ऑपरेशनल कामगिरीचा आढावा:
| नवीन क्षेत्र विक्री | Q2FY26 | Q1FY26 | Q2FY25 | QoQ | YoY | H1FY26 | H1FY25 | YoY |
| मूल्य (कोटी रु. मध्ये) | 670 | 616 | 770 | 9% | -13% | 1,286 | 1,481 | -13% |
| आकार (दशलक्ष चौ.फूट) | 0.86 | 0.84 | 1.03 | 2% | -17% | 1.70 | 1.99 | -15% |
| उत्पन्न (रु. प्रति चौ.फूट) | 7,823 | 7,337 | 7,472 | 7% | 5% | 7,582 | 7,441 | 2% |
| मिळकत (कोटी रु.मध्ये) | 596 | 550 | 550 | 8% | 8% | 1,146 | 1,162 | -1% |
संकलनात डीएमए प्रकल्पांचे योगदान समाविष्ट आहे.
· आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रीत 9% ची वाढ होऊन ती 670 कोटी रुपयांवर पोहोचली.
o या तिमाहीतील विक्रीत टिकाऊ इन्व्हेंटरीचे लक्षणीय योगदान.
· विक्रीचे प्रमाण 0.86 दशलक्ष चौरस फूट. गेल्या तिमाहीच्या तुलनेत 2% वाढ.
o केपीडीएलचा प्रमुख एकात्मिक टाउनशिप प्रकल्प, लाईफ रिपब्लिकने आर्थिक वर्ष 26च्या दुसऱ्या तिमाहीत 0.51 दशलक्ष चौरस फूट विक्री नोंदवली.
· या तिमाहीत 596 कोटी रुपयांची मिळकत, गेल्या तिमाहीच्या तुलनेत 8% वाढ. सर्व प्रकल्पांमधील बांधकामाच्या चांगल्या गतीमुळे झाली वाढ.
· 7,823 रुपये प्रति चौरस फूट या दराने मिळकतीत वाढ. तिमाहीत 7% तर वार्षिक 5% वाढ. प्रमुख प्रकल्पांमधील निश्चित किंमत आणि आमच्या 24K प्रोजेक्टला असलेल्या मागणीमुळे ही वाढ झाली.
· ऑक्टोबर 2025 मध्ये, कंपनीने पुण्यातील भूगाव येथे सुमारे 7.5 एकर जमीन खरेदी केली, ज्याचे विक्रीयोग्य क्षेत्र अंदाजे 1.9 दशलक्ष चौरस फूट आणि एकूण विकास मूल्य (GDV) रु. 1,400 कोटी.
या कामगिरीबद्दल भाष्य करताना, कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश पाटील म्हणाले,
“आम्ही विक्रीपूर्व मूल्यात 9% आणि संकलनात 8% अशी उत्तम तिमाही वाढ नोंदवल्याचा मला आनंद आहे. आर्थिक वाढ, कमी व्याजदर आणि घटत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढेल अशी आम्हाला आशा आहे. विस्ताराच्या अनुषंगाने, आम्ही आमचा पोर्टफोलिओ अधिक मजबूत करत आहोत. अलीकडेच आम्ही पुण्यातील भूगाव येथे 1,400 कोटी रुपयांच्या अंदाजे जीडीव्हीसह ~7.5 एकर जमीन खरेदी केली आहे.
या तिमाहीतील एका महत्त्वाच्या घडामोडीमध्ये, ब्लॅकस्टोनने कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 40% पर्यंत वाढवली. कंपनीच्या वाढीच्या प्रवासात ही भागीदारी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण आम्ही जलदगतीने विस्तार, नवोपक्रमाला चालना आणि या क्षेत्रातील नेतृत्व मजबूत करण्याच्या सामायिक दृष्टिकोनासह पुढे जात आहोत. विश्वास, नवोपक्रम आणि ग्राहक प्राधान्य या तत्त्वांना अनुसरून कंपनी सर्व भागधारकांसाठी शाश्वत वाढ आणि दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी भक्कम आहे.”

