भारतीय बाजारपेठेमध्ये आयपीओ सदरीकरणाला वेग आलेला असून विविध कंपन्यांनी आयपीओसाठी सेबी कडे अर्ज दाखल केले आहेत.
‘ऑग्मंट एंटरप्रायझेस लिमिटेड’
ऑग्मंट एंटरप्रायझेस लिमिटेड ही सोने व चांदी या क्षेत्रांतील एकात्मिक प्लॅटफॉर्म कंपनी असून देशातील 24 राज्यांत ती कार्यरत आहे. ही कंपनी सुवर्ण व रौप्य मूल्यसाखळीतील विविध टप्प्यांत कार्यरत आहे. यामध्ये खरेदी व रिफाइनिंग, बुलियन ट्रेडिंग, डिजिटल सुवर्ण विक्री, दागिन्यांचे उत्पादन, आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री तसेच सोन्याच्या आधारावर वित्तीय सेवा यांचा समावेश आहे.
कंपनीने 800 कोटींच्या ‘आयपीओ’साठी डीआरएचपीदाखल केला असून, या ‘आयपीओ’मध्ये प्रत्येकी 5 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे, 620 कोटी रुपयांचे नवे इक्विटी शेअर (फ्रेश इश्यू) आणि 180 कोटींचे प्रवर्तकांकडील इक्विटी शेअर (ऑफर फॉर सेल – ओएफएस) यांच्या विक्रीचा प्रस्ताव आहे.
लर्नफ्लुएन्स एज्युकेशन लिमिटेड
विद्यार्थी, पदवीधर आणि व्यावसायिकांसाठी मल्टी-मॉडेल लर्निंग (कॅम्पस आणि ऑनलाइन) ऑफर करणाऱ्या लर्नफ्लुएन्स एज्युकेशन लिमिटेड ही लक्ष्यची मूळ कंपनी 8 शहरांमध्ये कार्यरत आहे. डीआरएचपीनुसार, प्रस्तावित आयपीओ म्हणजे ₹2,460 दशलक्ष (246 कोटी) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि 40,00,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या विक्री ऑफर (ओएफएस) यांचे समन्वयन आहे. ऑरवेल लिओनेल हे ऑफरसाठी शेअरहोल्डर्स विक्री करणारे प्रमोटर आहेत.
विश्वराज एनव्हीरॉनमेंट लिमिटेड
पाणी सुविधा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पांची आघाडीची विकासक कंपनी विश्वराज एनव्हीरॉनमेंट लिमिटेडने औद्योगिक वापरासाठी प्रक्रिया केलेल्या मैलापाणी पुनर्वापरावर लक्ष केंद्रित केले असून कंपनीने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे दाखल केला आहे.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री प्रस्तावामध्ये (आयपीओ) 1,250 कोटी रु. पर्यंतचे फ्रेश इश्यू आणि प्रवर्तक विक्री समभागधारक प्रीमियर फायनान्शीयल सर्व्हिसेस लिमिटेड कडून 1,000 कोटी रु. पर्यंतचा विक्री प्रस्ताव (Offer for Sale) समाविष्ट आहे. BRLMs सोबतच्या सल्लामसलतीनुसार, VEL आपले RHP दाखल करण्यापूर्वी 250 कोटी रु. पर्यंतचा पूर्व आयपीओ विचारात घेऊ शकते. जर हे करण्यात आले तर उभारलेली रक्कम फ्रेश इश्यू मधून कमी केली जाईल.
कॉमटेल नेटवर्क्स लिमिटेड
महत्त्वाच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांसाठी समग्र दूरसंचार, सुरक्षा आणि सेफ्टी (iTSS) प्रणालींचे डिझाईन, बांधणी आणि अंमलबजावणी मधील तज्ज्ञ कॉमटेल नेटवर्क्स लिमिटेड (“कंपनी”) ने विशेषतः तेल आणि वायू तसेच वीज क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या या कंपनीने 19 देशांमध्ये 600 प्रकल्प पूर्ण केले असून त्याद्वारे 400 हून अधिक ग्राहकांना सेवा पुरविली आहे.
डीआरएचपी नुसार, प्रस्तावित आयपीओ हा 1,500.00 दशलक्ष रु. (150 कोटी रु.) पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 7,500.00 दशलक्ष रु. (750 कोटी रु.) पर्यंतची ऑफर फॉर सेल (OFS) यांचे एकत्रित मिश्रण आहे. त्यामुळे एकूण ऑफर साइज 9,000.00 दशलक्ष रु. (900 कोटी रु.) पर्यंत असेल.
जेराई फिटनेस लिमिटेड
जेराई फिटनेस लिमिटेड ही भारतातील फिटनेस उपकरणे उत्पादित करणारी कंपनी असून, व्यावसायिक जिम, हॉटेल, कॉर्पोरेशन्स, रिअल इस्टेट प्रोजेक्ट्स यांसारख्या विविध ग्राहकांसाठी ती उपकरणे तयार करते. ही उत्पादने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विकली जातात.
प्रस्तावित ‘आयपीओ’मध्ये प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या ४३,९२,५०० इक्विटी शेअर्सची विक्री ‘ऑफर फॉर सेल’च्या (ओएफएस) माध्यमातून करण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये राजेश रामसुख राय यांचे १५,००,००० शेअर्स, रिंकू राजेश राय (प्रवर्तक विक्रीदार) यांचे १६,९२,५०० शेअर्स आणि राजेश रामसुख राय एचयूएफ (प्रवर्तक गट विक्रीदार) यांचे १२,००,००० समभाग विक्रीस ठेवले जाणार आहेत.

