Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सणासुदीच्या काळात सुरक्षित डिजिटल पेमेंटसाठी एनपीसीआयकडून सुरक्षेसाठी 5 प्रमुख टिप्स

Date:

पुणे-सणासुदीचे दिवस म्हणजे उत्सव, भेटवस्तू आणि वाढत्या खरेदी विक्रीचा काळ. ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही ठिकाणी आकर्षक सवलती, मर्यादित काळासाठी विक्री आणि कॅशबॅक जाहिराती दिल्या जातात, जे खरेदीचा निर्णय वेगाने घेण्यास प्रोत्साहन देतात. सणासुदीच्या या गर्दीच्या दिवसात अनेकजण चांगली डील मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र, घोटाळे करणाऱ्यांना खरेदी करणाऱ्यांच्या या मानसिकतेची जाणीव असते आणि अनेकदा सोशल इंजिनीअरिंगद्वारे त्यांचा गैरफायदा घेतात. तंत्रज्ञानामुळे अनेक घोटाळे होत असताना, जागरूकता आणि काही जागरूक पावले ग्राहकांना सुरक्षित आणि विना अडथळा खरेदीचा अनुभव घेण्यास मदत करू शकतात.

अधिकृत ऍप्स आणि वेबसाइट्सवरूनच खरेदी करा: सणासुदीच्या हंगामात फसवणूक करणारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती आणि पेमेंट तपशील चोरण्यासाठी एकसारख्या दिसणाऱ्या वेबसाइट्स आणि लिंक्स तयार करतात. यामुळेच जिथून खरेदी करणार असाल त्या साइटचा वेब आयडी स्वतः टाका किंवा अधिकृत ऍप वापरा. ​​प्रमोशनल ईमेल, एसएमएस किंवा फॉरवर्ड केलेल्या मेसेजमधील लिंक्सवर क्लिक करणे टाळा. माहिती नसलेल्या स्त्रोतांवरील फाइल्स डाउनलोड करू नका किंवा लिंक्सवर क्लिक करू नका, कारण त्यामध्ये हानिकारक सॉफ्टवेअर असू शकते आणि ते तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकते.


फक्त संबंधित ऍपमध्येच पेमेंट पूर्ण करा: काही घोटाळ्यांमध्ये ग्राहकांना सुरक्षा तपासणी वगळून शॉपिंग ऍप किंवा साइटच्या बाहेरील यूपीआय आयडी किंवा लिंक्सवर पैसे देण्याचा आग्रह धरतात. त्यामुळेच नेहमी अधिकृत चेकआउट पेजवर व्यवहार पूर्ण करा आणि विक्रेत्याची माहिती नीट पाहून घ्या.

मोफत व्हाउचर आणि कॅशबॅक आश्वासनांबाबत सावधगिरी बाळगा: रिवॉर्ड्स, कॅशबॅक किंवा सणासुदीच्या भेटवस्तू देणाऱ्या मेसेजमध्ये ओटीपी, खात्याचे तपशील किंवा लहान “शुल्क” मागितले जाऊ शकते. ज्या ऑफर्स खऱ्या असतात त्यासाठी संवेदनशील माहिती किंवा आगाऊ पेमेंटची आवश्यकता नसते. त्यामुळे यावर क्लिक करण्यापूर्वी व्यवस्थित माहिती घ्या आणि पडताळणी करा.

ओटीपी मागणाऱ्या मेसेजमागचा इशारा समजून घ्या: पेमेंट अयशस्वी झाले आहे किंवा खाते ब्लॉक केले आहे असे सांगत काही मेसेज ओटीपी सांगण्यास सांगतात. मात्र, असे सांगितल्यास कधीही ओटीपी देऊ नये. ओटीपी हा केवळ ग्राहकांनी सुरू केलेल्या व्यवहाराची खात्री करण्यासाठी असतो. बँका किंवा पेमेंट ऍप्स कधीही कॉल किंवा मेसेजद्वारे ते विचारत नाहीत.


कोणत्याही दबावाखाली व्यवहार करू नका: घोटाळे करणारे किंवा फसवणारे ऑफर लवकरच संपेल किंवा तुम्ही कारवाई न केल्यास तुमचे खाते ब्लॉक होईल असे सांगून तुम्ही घाईने व्यवहार करावा अशी परिस्थिती निर्माण करतात. या उलट संबंधित कंपन्यांचे अधिकृत ऍप्स कधीही अशा प्रकारे मागे लागत नाहीत किंवा घाईघाईने व्यवहार करण्यास भाग पाडत नाहीत. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी खात्री करून घ्या.

सुरक्षित व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ हे तत्त्व स्वीकारले पाहिजे. कोणतेही संशयास्पद मेसेज आल्यास त्याचा थोडं थांबून, विचार करून, माहितीची पडताळणी करून आणि हुशारीने वागून ग्राहक स्वतःचे रक्षण करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील माहिती जपून ठेवू शकतात, ज्यामुळे व्यवहाराचा सुरक्षित अनुभव निश्चित होतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची शाश्वत विकासाच्या दिशेने दमदार वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन पुणे- शेती, पायाभूत सुविधा,...