Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सरकारी अधिकारी,बँक कर्मचारींसह ९ जनांनी संगनमत करून पुण्यातील बड्या हस्तीची केली सुमारे २० कोटीची फसवणूक:बनावट अकौंट,बनावट व्यक्ती उभ्या करुन केले बनावट खरेदीखत

Date:

पुणे-पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस यांचे बांधकाम व्यावसायिक असलेले पुत्र यांनी अभिनेते शम्मी पृथ्वीराज कपूर यांच्याकडून घेलेल्या जागेवर बांधलेल्या अलिशान प्रकल्पातील काही सदनिका सरकारी अधिकारी , बँक कर्मचारी यांच्या सहायाने परस्पर विक्री करून सणस यांना साडेपाच कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या ९ जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. सदनिका खरेदी व्यवहारात बनावट कर्ज प्रकरण तसेच दस्त नोंदणी करून बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी बँक अधिकारी, दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखे (युनिट २) कडे बांधकाम व्यावसायिक सुभाष बाबूराव सणस यांनी तक्रार दाखल केली आहे.तथापि सूत्राच्या माहिती नुसार आतापर्यंत २ सदनिकांच्या बाबत तक्रार दाखल झालेली असली तरी एकूण ५ सदनिकांचा असाच खोटा व्यवहार करून सणस यांची २० कोटीची फसवणूक केल्याचे वृत्त समजते आहे.

एका अनाेळखी व्यक्तीसह नितीन राजाराम पाटणकर, पुरुषोत्तम गजानन पाटणकर, मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर, विवेक शाम शुक्ला, हवेली दुय्यम निबंध कार्यालयातील निबंधक, डीबीएस बँकेतील अधिकारी, कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सणस बिल्डर्सकडून बांधण्यात येणाऱ्या लुल्लानगर येथील बेव्हरली हिल्स या गृहप्रकल्पाचे कुलमुख्यारधारक विठ्ठल नारायण भोरे यांच्या नावाने दोन सदनिका (२०१ आणि २०२ क्रमांकाची ) खरेदीसाठी अनोळखी आरोपीसह नितीन पाटणकर यांनी बनावट करारनामा केला. दस्त करून देणाऱ्या व्यक्तीस ओळखताे, म्हणून आरोपी मिलिंद गोसावी, प्राची पाटणकर, विवेक शुक्ला यांनी स्वाक्षरी केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे.हवेली (क्रमांक 20) दस्त नोंदणी कार्यालयातील निबंधकांनी कागदपत्रांची पडताळणी न करता दस्त नाेंदणीची प्रक्रिया केली.

सणस बिल्डर्सच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट खाते काढले

डीबीएस बँकेत कर्ज प्रकरण सादर करण्यात आले. बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्ज प्रकरणाची,व्यक्ती आणि कागदपत्रांची शहानिशा अगर पडताळणी न करता सणस बिल्डर्सच्या नावे साडेपाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले.विशेष म्हणजे सणस बिल्डर्सच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये बनावट खाते उघडण्यात आले. या खात्यात जमा झालेली 4 कोटी 33 लाख 98 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. सणस बिल्डर्सचे विठ्ठल भोरे यांच्या नावाने दुसरीच व्यक्ती उभी करून बनावट करारानामा केल्याचे सणस यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सणस यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करून याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी(९१३७३३ ९४४९) या फसवणुकी प्रकरणी तपास करत आहेत.

टीडीएस च्या मागणी मुळे लक्षात आला फसवणुकीचा प्रकार

श्री सणस यांनी असे म्हटले आहे कि,’मी सन 1992 पासून बांधकाम व्यवसाय करीत असून माझे ऑफीस 1302,
सणस प्लाझा, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, पुणे 2 याठिकाणी आहे. मी बेव्हरली हिल्स, लुल्लानगर, पुणे येथील सीटीएस क्रमांक 3348, 3349 व 3350 असलेले भूखंड क्रमांक 178,179,180 सन 1994 साली खरेदी केलेले आहेत, त्याचे एकूण क्षेत्रफळ 6033 चौ.मी आहे. सदरची मिळकत ही मी शम्मी पृथ्वीराज कपूर यांचेकडून दि. 21/01/2008 रोजी खरेदी खताद्वारे विकत घेतलेली असून त्याचा सह दुय्यम निबंधक, वर्ग 2. हवेली क्र. 11 पुणे येथील नोंदणी क्रमांक 737/2008 असा आहे. माझी मे. सणस बिल्डर्स या नावाने फर्म असुन मी वरील जागा विकसन करणेसाठी पुणे महानगरपालिका व इतर
प्राधिकरणांनी घातलेल्या सन 2005 मध्ये अटींची पूर्तता करुन सदर जागेवर सन 2001 रोजी बांधकाम सुरु करुन सदरचे बांधकाम पूर्ण केले होते. मी सदर जागेवर एकूण 16 फ्लॅट बांधण्याची परवानगी घेतले प्रमाणे बांधकाम पूर्ण केले आहे. एकूण 16 फ्लॅटचे बांधकाम पूर्ण करून त्यातील 6 फ्लॅटची विक्री केली असून उर्वरित 10 फ्लॅटची विक्री करणे बाकी आहे. फ्लॅट विक्री करीता मी माझेतर्फे माझेकडल कर्मचारी विठ्ठल नारायण भोरे, रा. 1302, शुक्रवार पेठ पुणे, यांना दि. 25/02/2020 रोजी दस्त क्र. 1790/2020 अन्वये पॉवर ऑफअॅटर्नी द्वारे कुलमुखत्यारी म्हणुन अधिकार प्रदान केले आहेत. दि. 13/01/2024 रोजी माझे वर नमुद कार्यालयामधील लँड लाईन यावर फोन आला त्यावेळी सदर कॉल माझे कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी नामे विठ्ठल नारायण भोरे यांनी घेतला असता समोरून एक अनोळखी व्यक्ती फोन वर बोलत होती व त्याने त्याचे नाव विनोद संकपाळ असे असून तो डीबीएस बँक इंडिया प्रा.लि. चा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने पुढे विचारले की, तुम्ही 1
टक्के टीडीएस कधी भरणार आहात? त्यावेळी माझे कर्मचारी भोरे यांनी विनोद संपकाळ यांचे कडे कोणता टीडीएस अशी विचारणा केली त्यावेळी विनोद संकपाळ यांनी त्यांचे कडील दि. 29/09/2023 रोजीचा खरेदी दस्ताची सुची क्र.2 ची प्रत, डीबीएस बँक इंडिया लि. यांना दिलेले पत्राची प्रत व डीबीएस बँक इंडिया लि. या बँकेकडील चॅकची प्रत असे भोरे यांचे
मोबईलवर व्हॉट्सअप द्वारे पाठविले. सदरची कागदपत्रे भोरे यांनी मला दाखविली असता त्यातील पत्र माझ्या मे. सणस बिल्डर्स या फर्मचे नावाचे बनावट लेटर हेड असुन त्यावर बनावट सही व बनावट शिक्का असल्याचे दिसून आले व सदरचे पत्र आमच्या फर्म कडून डीबीएस बँक इंडिया लि. शाखा नरीमन पॉर्इंट, मुंबई यांचे नावे दिलेले दिसत होते. तसेच खरेदी दस्त पाहीला असता त्यावर माझे बेव्हरली हिल्स, लुल्लानगर, पुणे येथील फ्लॅट नं. 201 व 202 ही मिळकत इसम नामे नितीन गजानन पाटणकर याने खरेदी केली असल्याचे दिसुन आले.
मी तात्काळ दिनांक 27/09/2023 रोजीच्या विक्रीच्या तत्कालीन बनावट आणि फसव्या कराराची प्रमाणित प्रत दुय्यम निबंध कार्यालय हवेली 20 येथुन मिळविली. सदर दस्त पाहीला असता त्यामध्ये असे दिसून आले की, माझे कर्मचारी व कुलमुखत्यारी म्हणून अधिकार प्राप्त असणारे विठ्ठल नारायण भोरे यांचे नावा समोर बनावट व्यक्ती उभी करुन त्याचा फोटो व बनावट सही करुन वर इसम नामे नितीन गजानन पाटणकर यास बेव्हरली हिल्स, लुल्लानगर, पुणे येथील फ्लॅट नं.201 व 202 ही मिळकत विक्री केलेली असून त्याचा दस्त क्रमांक18952/2023 दि. 27/09/2023 दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली 20 येथे नोंदणी केला असून सदर दस्त नोंदणी करते वेळी दोन्ही मिळकतीचा दस्तऐवज करुन देणा-या व्यक्तीस व्यक्तीशः ओळखतो म्हणून पुरुषोत्तम गजानन पाटणकर, रा. चिंचवड पुणे व मिलींद गोसावी, रा. कात्रज, पुणे यांनी त्यांची स्वाक्षरी करुन त्यांचा डिजीटल फोटो दिलेला आहे. तसेच सदर दस्तास साक्षीदार म्हणून प्राची पाटणकर रा. इचलकरंजी व विवेक शाम शुक्ला, रा. बिबवेवाडी, पुणे यांनी सह्या केलेल्या आहेत. तसेच दुय्यम निबंधक यांनी कुलमुखत्यारी यांचे घोषणापत्र, खरेदीदार यांचे आधारकार्ड अशा कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा केलेली नाही, तसैच सदर दस्ताच्या प्रत्येक पानावर दस्त लिहून घेणार व लिहून देणार यांच्या स्वाक्षरी दिसून येत नाहीत. तसेच दस्ताचे शेवट्चे पानावर असणारा फोटो मीदिलेला नसून त्याचे बाजूला उमटविणेत आलेला अंगठयाचा ठसा व सही माझी नाही, तसेच दस्तामध्ये बनावट कम्प्लीशन सर्टीफिकीट जोडलेले दिसून येत आहे, फ्लॅटचा नकाशा न जोडता सदरचा दस्त नोंदणी केल्याचे दिसून येत आहे.तसेच डीबीएस बैंक इंडिया लि. यातील संबंधित बँक अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता इसम नामे नितीन गजानन पाटणकर यास बेव्हरली हिल्स, लुल्लानगर, पुणे येथील फ्लॅट नं.201 व 202 साठी कोट्यावधी रुपयांचे कर्ज मंजूर केलेले आहे. वर नमुद खरेदीखता मध्ये वरील दोन्ही फ्लॅट करीता रु.5 कोटी 50 लाखांचा उल्लेख असून मला नमूद फ्लॅट विक्री साठी एकही पैसा मिळालेला नसुन सदर फ्लॅट मी विक्री केलेला नाही.
यातील नमूद इसमांनी मिळून सणस बिल्डर्स या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये खाते क्रमांक 60451650049 असे बनावट खाते उघडून सदर व्यवहारातील रक्कम रु. 04,33,98,900/- एवढी रक्कम नमूद खात्यात डीडी द्वारे वर्ग केली आहे. तरी सब रजिस्टार हवेली क्र. 20, जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक, दत्तनगर पुणे येथे दि. 27/09/2023 रोजीदस्त क्रमांक 18952/2023 हा नोंद करते वेळी मे. सणस बिल्डर्स यांचे प्रो. सुभाष बाबुराव सणस यांचे तर्फे कुलमुखत्यारी म्हणून श्री. विठ्ठल नारायण भोरे याचे नावाचे समोर 1) अनोळखी व्यक्ती वय अंदाजे 60 वर्षे, यास उभी राहून त्या व्यक्तीने इसम नामे नं. 2) नितीन गजानन पाटणकर, वय 35 वर्षे, रा. फ्लॅट नं. 7, महालक्ष्मी प्लाझा, जुना चांदुर रोड, इचलकरंजी, हातकनंगले, कोल्हापुर 416115 याचे नावे वर नमुद बेव्हरली हिल्स, लुल्लानगर, पुणे येथील फ्लॅट नं.201 व 202 या फ्लॅटच्या खरेदीसाठी बनावट करारानामा केला व सदर दस्त करुन देणा-या प्राची पाटणकर, रा. इचलकरंजी, कोल्हापुर, 6) विवेक शाम शुक्ला, रा. बिबवेवाडी पुणे, यांनी सहया केलेल्या यांनी कर्जदार यांनी कर्जाकरीता बनावट कागदपत्रे खरी म्हणुन सादर केली त्या कागदपत्रांची पडताळणी न करता मे.व्यक्तीस व्यक्तीशः ओळखतो म्हणून 3) पुरुषोत्तम गजानन पाटणकर, वय 38 वर्षे, रा. चिंचवड, पुणे व 4) मिलींद गोसावी, वय 50 वर्षे, रा. कात्रज पुणे यांनी हजर राहून स्वाक्षरी केलेली आहे, तसेच दस्तास साक्षीदार म्हा म्हणून 5)आहेत. 7) सब रजिस्टार हवेली नं. 20 येथील रजिस्टार यांनी कोणत्याही कागदपत्रांची व व्यक्तींची पडताळणी न करता दस्त नोंदणी करण्याची प्रक्रिया केलेली आहे. तसेच 8) डीबीएस बँक इंडिया लि. पुणे, मधील संबंधित व्यक्तीसणस बिल्डर्स यांचे नावे 5,50,00,000/- रुपयांचे कर्ज मंजूर करून दिले आहे. व 9) बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे येथील संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता वर नमुद व्यक्तींना मे. सणसबिल्डर्स यांचे नावे बनावट करंट अकाऊंट नं. 60451650049 हे उघडण्यास मदत केली असुन सदर खात्यामध्ये रक्कम रु.04,33,98,900/- एवढी रक्कम डीडीद्वारे वर्ग झालेली आहे. वर नमुद व्यक्ती यांनी माझे संमती शिवाय आपआपसात संगणमत करून स्वत:च्या फायद्या करीता मे. सणस बिल्डर्स फर्म तर्फे मी कुलमुखत्यारी म्हणुन नेमलेले श्री. विठ्ठल नारायण भोरे यांजे ऐवजी दुसरीच व्यक्ती उभी करून माझे मालकीचे बेव्हरली हिल्स, लुल्लानगर, पुणे येथील फ्लॅट नं. 201 व 202 हे फ्लॅट खरेदी केल्याचा करारनामा करून माझी फसवणुक केली आहे. म्हणून वर नमूद व्यक्ती यांचे विरुद्ध माझी कायदेशिर फिर्याद आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...